शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या तान्या भोसले टोळीतील सात जणांना हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:09 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोक्कातील सात आरोपींना सत्र न्यायालयाद्वारे सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला.

ठळक मुद्देमोक्काचे प्रकरण: सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायमखंडेलवाल ज्वेलर्सवर घातला होता दरोडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोक्कातील सात आरोपींना सत्र न्यायालयाद्वारे सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला.तान्या विठ्ठल भोसले ऊर्फ भोळे, ओमप्रकाश ऊर्फ ओम्या भारत भाटकर, दिलीप ऊर्फ किसन वाघ, अनिल भागवत मोहणकर, जन्या ऊर्फ जनार्धन रामराव वाघमारे ऊर्फ राजेश साने, नसरीनबानो रफिक शेख व रफिक शेख नबी शेख अशी आरोपींची नावे आहेत. ५ आॅगस्ट २०१४ रोजी अमरावतीमधील विशेष सत्र न्यायालयाने आरोपी वाघमारे, रफिक शेख व भोसले यांना १२ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त कारावास, आरोपी मोहणकर, वाघ व भाटकर यांना प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व पाच लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त कारावास तर, आरोपी नसरीनबानो व अंजली ऊर्फ आरती जनार्धन वाघमारे यांना प्रत्येकी चार वर्षे सश्रम कारावास व दोन लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास नऊ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती. अन्य आरोपी दिलीप कोरडे याला निर्दोष सोडण्यात आले होते. शिक्षा झालेल्या आरोपींनी या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी विविध बाबी लक्षात घेता अंजली वगळता इतर सर्व आरोपींचे अपील फेटाळून लावले व सत्र न्यायालयाचा त्यांच्यासंदर्भातील निर्णय कायम ठेवला. अंजलीचे अपील अंशत: मंजूर करण्यात आले. तिने आतापर्यंत भोगलेली शिक्षा पुरेशी ठरविण्यात आली. तसेच, दंड न भरल्यास भोगावयाचा कारावास दोन महिन्यापर्यंत कमी करून तिला हा कारावास भोगण्याचा आदेश देण्यात आला. सरकार पक्षानुसार आरोपी संघटितपणे गुन्हे करीत होते. ३१ आॅगस्ट २०१० रोजी त्यांनी अमरावती येथील खंडेलवाल ज्वेलरी दुकानात दरोडा टाकला होता. त्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी अन्य विविध गुन्ह्यांची कबुली दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMCOCA ACTमकोका कायदा