शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोपालदास अग्रवाल यांना हायकोर्टाची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:25 IST

गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी जोरदार चपराक लगावली. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हालचाली केल्यास गंभीर भूमिका घेतली जाईल. न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अग्रवाल यांना देण्यात आला.

ठळक मुद्देकारवाई करण्याचा इशारा : म्हटले, आदेशात हस्तक्षेप खपणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी जोरदार चपराक लगावली. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हालचाली केल्यास गंभीर भूमिका घेतली जाईल. न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अग्रवाल यांना देण्यात आला.उच्च न्यायालयात गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता नवीन इमारत बांधण्यासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. महसूल कर्मचारी संघटनेच्या ताब्यातील काही गाळे या प्रकल्पामध्ये अडथळा ठरत होते. त्यामुळे २३ मार्च २०१८ रोजी न्यायालयाने संबंधित गाळे तोडून संघटनेकरिता प्रशासकीय इमारतीमध्ये नवीन गाळे बांधण्याचा आदेश दिला होता. त्याकरिता एफएसआय वाढविण्याचे निर्देशही दिले होते. दरम्यान, आमदार अग्रवाल व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी प्रशासकीय इमारतीमध्ये गाळे बांधण्यावर आक्षेप घेतले. ही बाब न्यायालयाला खपली नाही. त्यामुळे न्यायालयाने अग्रवाल यांना तंबी दिली.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रशासकीय इमारत ते महामार्ग यादरम्यान आवश्यक असलेल्या अंतराबाबत आक्षेप उपस्थित केला आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता यांना नोटीस बजावली व अंतराच्या अटीमध्ये शिथिलता दिली जाऊ शकते किंवा नाही यावर १ जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्याने प्राधिकरणचे अधीक्षक अभियंत्याकडे जाऊन त्यांना नकाशा व न्यायालयाच्या आदेशावरून परिस्थिती समजावून सांगावी असे निर्देशही दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गोंदिया जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. पराग तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल