शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : आर्थिक घोटाळ्यातील चार आरोपींना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 22:11 IST

भारतीय अपंग सहकारी संस्थेमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले पदाधिकारी फैजी मोईन शेख (महाव्यवस्थापक), रिजवाना इशाख खान (सचिव), निर्मला शालिक गिरमकर (अध्यक्ष) व नुसरीन फैजी शेख (संचालक) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला.

ठळक मुद्देअटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय अपंग सहकारी संस्थेमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले पदाधिकारी फैजी मोईन शेख (महाव्यवस्थापक), रिजवाना इशाख खान (सचिव), निर्मला शालिक गिरमकर (अध्यक्ष) व नुसरीन फैजी शेख (संचालक) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला. न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला.१७ फेब्रुवारी रोजी तहसील पोलिसांनी पेपर व्यावसायिक सत्यनारायण मालू यांच्या तक्रारीवरून या चौघांसह अन्य आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ३४ व एमपीआयडी कायद्यातील कलम ३ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. आरोपींनी मालू यांना संस्थेमधून ३८ कोटी रुपयाचे कर्ज देण्याचे आमिष दाखवले होते. मालू आरोपींच्या आमिषाला बळी पडले व त्यांनी आरोपींना सदस्यता शुल्क, सुरक्षा ठेव व प्रक्रिया शुल्कापोटी वेळोवेळी एकूण ५४ लाख ५० हजार रुपये अदा केले. त्यानंतर आरोपींनी मालू यांना कर्ज दिले नाही व त्यांची रक्कमही परत केली नाही.बेरोजगार सुशिक्षित व्यक्तींना आर्थिक मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु, या संस्थेने आतापर्यंत एकाही बेरोजगार सुशिक्षित व्यक्तीला कर्ज दिले नाही. २००९ ते २०१६ पर्यंतच्या लेखा परीक्षणात अनेक गैरव्यवहार आढळून आले आहेत. सध्या संस्थेच्या दोनपैकी एका बँक खात्यात केवळ २० हजार तर, दुसऱ्या खात्यात १ लाख ९५ हजार ६०० रुपये शिल्लक आहेत. आरोपींनी इतर रक्कम काढून स्वत:च्या फायद्यासाठी वापरली आहे. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी