शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

एम्प्रेस मॉल अनियमिततेबाबत हायकोर्ट गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:00 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ एम्प्रेस मॉलमधील अनियमिततेबाबत गंभीर असून या प्रकरणातील सर्व मुद्दे सखोलपणे विचारात घेण्याचे संकेत मंगळवारी देण्यात आले.

ठळक मुद्देजनहित याचिका : सर्व मुद्दे विचारात घेण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ एम्प्रेस मॉलमधील अनियमिततेबाबत गंभीर असून या प्रकरणातील सर्व मुद्दे सखोलपणे विचारात घेण्याचे संकेत मंगळवारी देण्यात आले.यासंदर्भात चंदू लाडे व राकेश नायडू यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, एम्प्रेस मॉल बांधणाऱ्या केएसएल अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज कंपनीने बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. महापालिका योग्य ती कारवाई करीत असल्यामुळे एम्प्रेस मॉलला याचिकेतून वगळण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. परंतु, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत कंपनीची विनंती मान्य करण्यास नकार दिला. एम्प्रेस मॉलशी संबंधित सर्व याचिका एकत्रित करण्यात आल्या असून त्यातील मुद्यांवर अद्याप चर्चा झालेली नाही असे न्यायालयाने सांगितले. तसेच, प्रकरणावर ३ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. विवेक भारद्वाज तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.याचिकाकर्त्यांचे म्हणणेएम्प्रेस मॉल बांधताना कायदे व नियमांना केराची टोपली दाखव्विण्यात आली आहे. एम्प्रेस मॉलच्या इमारतीचा आराखडा नियमानुसार नाही. काही ठिकाणी अवैध बांधकाम करण्यात आले आहे. अग्निशमन यंत्रणा नियमानुसार नसल्यामुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने एम्प्रेस मॉलला असुरक्षित घोषित केले आहे. याशिवाय एम्प्रेस मॉलमध्ये अनेक सुरक्षाविषयक सुविधा नाहीत असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Empress Mallएम्प्रेस मॉलHigh Courtउच्च न्यायालय