शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा समृद्धी महामार्गात हस्तक्षेपास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 23:25 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या बांधकामात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे.

ठळक मुद्देपीडितांना मिळणार योग्य भरपाई

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या बांधकामात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे.अमरावती जिल्ह्यातील अमोल डांगे व इतर पाच जमीन मालकांनी विविध मागण्यांसह उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या होत्या. समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित केली जाऊ नये, अशी एक मागणी होती. न्यायालयाने सरकारला असाकाही आदेश देण्यास नकार दिला. हा सरकारचा धोरणात्मक भाग असून त्यात हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. समृद्धी महामार्ग न बांधता सध्याचाच रोड वापरण्यात यावा, अशी याचिकाकर्त्यांची दुसरी मागणी होती. ती मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली. समृद्धी महामार्ग बांधताना पर्यावरणाचे संरक्षण करण्यात यावे, अशी याचिकाकर्त्यांची तिसरी मागणी होती. न्यायालयाने त्यावर मत व्यक्त करताना राज्य सरकार पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत संवेदनशील असल्याचे सांगितले.सुनावणीदरम्यान, राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ यांनी समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मालकांना २०१३ मधील नवीन कायद्यानुसारच योग्य ती भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही न्यायालयाला दिली आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता दोन्ही याचिका निकाली काढल्या. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग