शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : हुंकार सभेवर स्थगितीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:23 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रदेशच्या हुंकार सभेवर स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, आयोजकांना सभा घेताना अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत.

ठळक मुद्देअटी व शर्तींचे पालन करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रदेशच्या हुंकार सभेवर स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, आयोजकांना सभा घेताना अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत.ही सभा येत्या २५ नोव्हेंबर रोजी क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सक्करदरा पोलिसांनी सभेला परवानगी देताना २३ अटी व शर्ती निश्चित करून दिल्या आहेत. या सभेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी विविध आक्षेप नोंदवून सभेवर स्थगिती देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बाजू ऐकून ही विनंती अमान्य केली व आयोजकांना ही सभा घेताना अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत. आयोजकांनी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास याचिकाकर्ते अवमानना याचिका दाखल करू शकतात असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले. तसेच, गृह विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, महानगर संघचालक राजेश लोया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू व ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य यांना नोटीस बजावून याचिकेतील मुद्यांवर उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले. या प्रकरणावर आता नाताळाच्या सुट्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले, आरएसएसतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर तर, सरकारतर्फे वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल यांनी कामकाज पाहिले.असे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणेअयोध्या येथे राम मंदिर बांधण्याचा मुद्दा पुढे रेटण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात अयोध्या वादाचे प्रकरण प्रलंबित असून त्यावर येत्या जानेवारीमध्ये पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ही सभा आयोजित करणे बेकायदेशीर आहे. आयोजक विशिष्ट समाजापुरते मर्यादित आहेत. त्यामुळे ही सभा आयोजित केल्यास इतर समाजांमध्ये असंतोष निर्माण होईल असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAyodhyaअयोध्या