शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : टेकडी मंदिरातील हीट व्हेंटिलेशन तोडण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 21:59 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने टेकडी गणेश मंदिरातील हीट व्हेंटिलेशन व कुलिंग सिस्टीम डक तोडण्यास अंतरिम मनाई केली. तसेच, उप-धर्मादाय आयुक्त, गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या प्रकरणावर ३ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देमंदिर ट्रस्ट अध्यक्षांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने टेकडी गणेश मंदिरातील हीट व्हेंटिलेशन व कुलिंग सिस्टीम डक तोडण्यास अंतरिम मनाई केली. तसेच, उप-धर्मादाय आयुक्त, गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या प्रकरणावर ३ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.यासंदर्भात ट्रस्टचे सचिव संजय जोगळेकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मंदिरात सुमारे ४० लाख रुपये खर्च करून हीट व्हेंटिलेशन व कुलिंग सिस्टीम डक बांधण्यात आले आहे. परंतु, ट्रस्ट अध्यक्षांनी कार्यकारी समितीच्या मान्यतेशिवाय ते तोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्यावर अंमलबजावणीही सुरू केली. त्याविरुद्ध उप-धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला असता त्यांनी लॉकडाऊनमुळे त्याची दखल घेतली नाही. भाविकांच्या देणगीतून हीट व्हेंटिलेशन व कुलिंग सिस्टीम डकचे काम करण्यात आले आहे. ते तोडण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे वादग्रस्त कारवाई अवैध ठरविण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता याचिकाकर्त्याला दिलासा दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTekdi Ganesh Mandirटेकडी गणेश मंदिर