शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सरकार गप्प बसल्यास अ‍ॅफकॉनविरुद्ध हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:24 IST

राज्य सरकार गप्प बसल्यास अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व संबंधित उपकंत्राटदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून न्याय मागू, अशी भूमिका कोटंबा (ता. सेलू, जि. वर्धा) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संदीप खेडकर यांनी ‘लोकमत’समक्ष मांडली.

ठळक मुद्देसंदीप खेडकर यांची भूमिका : पर्यावरण उद्ध्वस्त करणारी कंपनी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य सरकार गप्प बसल्यास अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व संबंधित उपकंत्राटदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून न्याय मागू, अशी भूमिका कोटंबा (ता. सेलू, जि. वर्धा) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संदीप खेडकर यांनी ‘लोकमत’समक्ष मांडली.अ‍ॅफकॉन कंपनी व संबंधित उपकंत्राटदारांनी समृद्धी महामार्गासाठी मौजा इटाळा, मौजा कोटंबा व मौजा महाबळा येथील तलाव व झुडपी जंगलांसह शेकडो एकर सरकारी, आदिवासी व खासगी जमिनीवर अवैध खोदकाम करून मुरुम, रेती व दगड बाहेर काढले. तसेच, मोठ्या आकाराची व पर्यावरणोपयोगी साग, कडुनिंब, बोर, सिरस, रामकाठी, प्रासोपिक इत्यादी हजारो जुनी झाडे तोडली. उंच टेकड्या सपाट केल्या. वन कायद्यातील तरतुदींना अक्षरश: केराची टोपली दाखवली. त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले, असे खेडकर यांचे म्हणणे आहे. अ‍ॅफकॉन कंपनी व उपकंत्राटदारांवर कडक कारवाई व्हावी, याकरिता ते गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, लोकायुक्त, वन विभाग, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आदींकडे तक्रारी केल्या आहेत. अ‍ॅफकॉन कंपनी व उपकंत्राटदारांविरुद्ध कठोर कारवाई होण्याची ते प्रतीक्षा करीत आहेत.ग्राहक आयोग, हरित न्यायाधिकरणकडे तक्रारीखेडकर यांनी यासंदर्भात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्याकडे टपालाने तक्रारी पाठवल्या होत्या. त्यांना या दोन्ही प्राधिकरणांकडून उत्तर मिळाले आहे. दोन्ही प्राधिकरणांनी त्यांना कायदे व नियमानुसार तक्रार दाखल करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार