शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ८७ ट्रॅव्हल्स कंपन्यांची प्रवासी वाहतूक बंद करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:00 IST

शहरातील ८७ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची प्रवासी वाहतूक येत्या १५ जानेवारीपासून बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्रादेशिक परिवहन विभागाला दिला.

ठळक मुद्दे१५ जानेवारीपासून कारवाई करण्याची मुभा

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील ८७ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची प्रवासी वाहतूक येत्या १५ जानेवारीपासून बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्रादेशिक परिवहन विभागाला दिला. या आदेशामुळे मुजोरीने वागत असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना जोरदार दणका बसला आहे. परिणामी, त्यांना १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात उपस्थित राहून ते प्रवाशांची अवैधपणे वाहतूक करीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. अन्यथा, त्यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली जाईल.प्रवाशांच्या अवैध वाहतुकीसंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, शासनाने शहरातील ८७ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना २४ नोव्हेंबर रोजी वर्तमानपत्राद्वारे नोटीस तामील केली होती. कंपन्यांना २९ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित होऊन स्वत:ची बाजू स्पष्ट करायची होती. परंतु, त्या तारखेला कोणीच न्यायालयात उपस्थित झाले नाही. परिणामी, न्यायालयाने सर्व कंपन्यांना २० डिसेंबर ही तारीख दिली होती. या तारखेलाही कंपन्या हजर झाल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाने ही बाब गंभिरतेने घेऊन वरीलप्रमाणे आदेश दिला. या आदेशाने कंपन्यांमध्ये खळबळ माजली असून त्यांच्या पुढील कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणात अ‍ॅड. हरनीश गढिया न्यायालय मित्र आहेत.२०० मीटरच्या बंधनाची पायमल्लीशासकीय बसस्थानकापासून २०० मीटरच्या आत खासगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक करता येत नाही. तसेच, या परिसरात खासगी वाहनांची पार्किंग करण्यास प्रतिबंध आहे. शहरातील गणेशपेठ बसस्थानकाच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी १५ फेब्रुवारी १९९६ रोजी तर, पोलिसांनी ३ एप्रिल १९९६ रोजी अधिसूचना जारी करून खासगी वाहनांना प्रतिबंध केला आहे. असे असतानाही खासगी वाहन चालकांनी बसस्थानकांपासून २०० मीटरच्या आत कार्यालये उघडली आहेत. त्यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय