शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक बाधितांना भरपाई देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 10:17 IST

कीटकनाशकांमुळे विविध प्रकारची इजा पोहोचलेले शेतकरी व शेतमजुरांना समाधानकारक भरपाई देण्यावर तीन महिन्यांत धोरणात्मक निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देउपचारावरील खर्चही परत करण्यास सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कीटकनाशकांमुळे विविध प्रकारची इजा पोहोचलेले शेतकरी व शेतमजुरांना समाधानकारक भरपाई देण्यावर तीन महिन्यांत धोरणात्मक निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला. तसेच, सर्वच बाधितांच्या उपचारावर झालेला खर्चही परत करण्यास सांगितले. त्यामुळे हजारो शेतकरी व शेतमजुरांना दिलासा मिळाला आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी अर्ज सादर केला होता. सध्या कीटकनाशक बाधितांना सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपये भरपाई दिली आहे. अर्जदाराने त्यावर असमाधान व्यक्त करून प्रत्येक बाधिताला २५ हजार रुपये भरपाई देण्याची विनंती केली होती. न्यायालयाला अर्जदाराच्या मागणीत तथ्य आढळून आल्यामुळे सरकारला हा आदेश देण्यात आला. राज्यात दीड हजारावर शेतकरी व शेतमजूर कीटकनाशकांमुळे बाधित झाले आहेत. कुणाला अंधत्व आले आहे तर, कुणाला अन्य विविध प्रकारची इजा पोहोचली आहे. आतापर्यंत सरकारने केवळ ८२८ बाधितांना प्रत्येकी पाच हजार रुपये भरपाई दिली आहे असे अर्जदाराने न्यायालयाला सांगितले.याविषयीच्या मूळ प्रकरणात न्यायालयाने आत्महत्या करणाऱ्या व अनैसर्गिक मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना समान भरपाई देण्यावर धोरणात्मक निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच, मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई वाढवून दिली आहे. त्यामुळे एकूण भरपाई चार लाख रुपये झाली आहे. सरकारने त्यांना केवळ प्रत्येकी दोन लाख रुपये भरपाई दिली होती. अर्जावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अर्जदारातर्फे अ‍ॅड. ए. के. वाघमारे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Farmerशेतकरी