शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचे अतिरिक्त शिष्यवृत्ती वाटपाची चौकशी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:35 IST

सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना ५९ लाख २६ हजार ३३ रुपयांची अतिरिक्त शिष्यवृत्ती वाटप झाल्याचा आरोप असून याप्रकरणाची सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला.

ठळक मुद्देनागपुरातील सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूटशी संबंधित प्रकरण

आॅनलाईन लोकमतनागपूर : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना ५९ लाख २६ हजार ३३ रुपयांची अतिरिक्त शिष्यवृत्ती वाटप झाल्याचा आरोप असून याप्रकरणाची सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला.चौकशीकरिता सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच, संबंधित सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशांनी त्यानंतर सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करावी असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. चौकशीचा खर्च भागविण्यासाठी राज्य शासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनचे संचालक प्रा. सुनील मिश्रा यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये तीन आठवड्यांत न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयात जमा करावेत असेही न्यायालयाने सांगितले आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते उमेश बोरकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम-१९९४ मधील कलम ५३ अनुसार शैक्षणिक शुल्काबाबतचे नियम/आदेश जारी करण्याचे अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला आहेत. परंतु, मिश्रा यांनी तत्कालीन कुलसचिव डॉ. अशोक गोमासे यांना हाताशी धरून ५ डिसेंबर २०१३ रोजी शिक्षण शुल्कवाढीचे अवैध पत्र काढून घेतले. त्यामुळे २०१३-१४ शैक्षणिक सत्रामध्ये सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूटमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ५९ लाख २६ हजार ३३ रुपयांची अतिरिक्त शिष्यवृत्ती मंजूर झाली असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ए. पी. दुबे, विद्यापीठातर्फे अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन, शासनातर्फे अ‍ॅड. निवेदिता मेहता तर, प्रा. सुनील मिश्रा यांनी स्वत:च बाजू मांडली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर