शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट :  शालेय शिक्षण विभाग सचिवांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 23:54 IST

थपाल नियुक्तीची मान्यता मागे घेण्याविषयीच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शालेय शिक्षण विभागाचे सचिव व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

ठळक मुद्देग्रंथपाल नियुक्तीची मान्यता मागे घेतली

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रंथपाल नियुक्तीची मान्यता मागे घेण्याविषयीच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शालेय शिक्षण विभागाचे सचिव व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.इतर प्रतिवादींमध्ये शिक्षण उपसंचालक, अकोला जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, भारत शिक्षण प्रसारक मंडळ, भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व शिक्षण आयुक्त यांचा समावेश आहे. सतीश सरकाटे असे पीडित ग्रंथपालाचे नाव आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांची अकोला येथील भारत विद्यालयात ग्रंथपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या नियुक्तीला देण्यात आलेली मान्यता शिक्षण उपसंचालकांनी गेल्या ३० जून रोजी मागे घेतली. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. न्यायालयाने वादग्रस्त आदेशावर अंतरिम स्थगिती दिली आहे. सरकाटे यांच्या नियुक्तीला पहिल्यांदा २९ आॅक्टोबर २०१० रोजी मान्यता प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पदावर कायम करून त्याला १४ जून २०१३ रोजी मान्यता देण्यात आली. आता वादग्रस्त आदेशाद्वारे आधीचे दोन्ही आदेश मागे घेण्यात आले आहेत. याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश मेघे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEducationशिक्षण