लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणात मंगळवारी न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी तुमाने यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.तुमाने रामटेक लोकसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. या निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्याचा फायदा तुमाने यांना मिळाला. तसेच, निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळे तुमाने यांची निवडणूक रद्द करून रामटेक लोकसभा मतदार संघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. प्रदीप वाठोरे यांनी कामकाज पाहिले.
हायकोर्ट : कृपाल तुमाने यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 20:35 IST
काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणात मंगळवारी न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी तुमाने यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
हायकोर्ट : कृपाल तुमाने यांना नोटीस
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीला आव्हान