शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट :  फडणवीस, मेघेंना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 20:24 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वेगवेगळ्या निवडणूक याचिकांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार समीर मेघे यांना नोटीस बजावून १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देदोघांच्याही निवडणुकीला आव्हान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वेगवेगळ्या निवडणूक याचिकांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार समीर मेघे यांना नोटीस बजावून १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकांवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.मतदार अ‍ॅड. सतीश उके यांनी फडणवीस तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय घोडमारे यांनी मेघे यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूर तर, मेघे हिंगणा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फडणवीस यांचे नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्र चुकीच्या पद्धतीने स्वीकारले. प्रतिज्ञापत्र वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी विलंब करण्यात आला. दरम्यान, नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्रातील अनेक त्रुटी अवैधपणे दूर करण्यात आल्या. यासह अन्य विविध गैरप्रकार फडणवीस यांना लाभ पोहचविण्यासाठी करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यात आले, असा उके यांचा आरोप आहे. घोडमारे यांनी बोगस मतदारांचा मुद्दा मांडला. मेघे यांनी वर्धा जिल्ह्यातील सुमारे ५० हजार मतदारांची नावे हिंगणा मतदारसंघात नोंदवली. त्यापैकी अनेक मतदार मेघे यांच्या संस्थांमध्ये कर्मचारी आहेत. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा मिळाला, असे घोडमारे यांचे म्हणणे आहे. उके यांनी स्वत: तर, घोडमारेतर्फे अ‍ॅड. आनंद देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSameer Megheसमीर मेघे