शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

हायकोर्ट : माधुरी मडावींना अंतरिम दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 19:35 IST

विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अमरावती येथील नगर रचना विभागातील सहायक संचालक माधुरी मडावी यांचा राजीनामा नामंजूर करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

ठळक मुद्देराजीनामा नामंजुरीवर स्थगिती

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अमरावती येथील नगर रचना विभागातील सहायक संचालक माधुरी मडावी यांचा राजीनामा नामंजूर करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.मडावी यांनी वादग्रस्त निर्णयाच्या वैधतेला रिट याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मडावी यांना अंतरिम दिलासा दिला. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्यास सांगितले. मडावी यांनी गेल्या २७ जुलै रोजी विभागीय आयुक्तांना राजीनामा दिला होता. विभागीय आयुक्तांनी तो राजीनामा राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने मडावी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असल्याच्या कारणावरून ११ सप्टेंबर रोजी त्यांचा राजीनामा नामंजूर केला. मडावी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजीनामा देत असल्याचे कारण सांगितले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर