शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

हायकोर्ट : जेएमएफसी न्यायालयाचे ते वादग्रस्त आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:04 IST

लैंगिक छळाच्या प्रकरणात कट रचून फसविल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विलास सपकाळ, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. अर्चना नेरकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशी वंजारी, डॉ. नीलिमा देशमुख, डॉ. ए. डी. चौधरी, डॉ. मंदाकिनी पाटील, डॉ. शैलेष पानगावकर, डॉ. अंजली हस्तक व डॉ. वंदना बावनकुळे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून गुन्ह्यांचा तपास करण्यात यावा, अशा विनंतीसह सावनेर येथील हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र जुमडे यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जेएमएफसी न्यायालयाचे दोन वादग्रस्त आदेश रद्द करून सपकाळ, नेरकर व वंजारी वगळता इतरांविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच सपकाळ, नेरकर व वंजारी यांच्याविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज आहे किंवा नाही, हे तपासून पाहण्यास सांगितले.

ठळक मुद्देकट रचून लैंगिक छळात फसविल्याचे नागपूर विद्यापीठातील प्रकरणतिघे वगळता इतरांविरुद्ध कार्यवाहीचा मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लैंगिक छळाच्या प्रकरणात कट रचून फसविल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विलास सपकाळ, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. अर्चना नेरकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशी वंजारी, डॉ. नीलिमा देशमुख, डॉ. ए. डी. चौधरी, डॉ. मंदाकिनी पाटील, डॉ. शैलेष पानगावकर, डॉ. अंजली हस्तक व डॉ. वंदना बावनकुळे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून गुन्ह्यांचा तपास करण्यात यावा, अशा विनंतीसह सावनेर येथील हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र जुमडे यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जेएमएफसी न्यायालयाचे दोन वादग्रस्त आदेश रद्द करून सपकाळ, नेरकर व वंजारी वगळता इतरांविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच सपकाळ, नेरकर व वंजारी यांच्याविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज आहे किंवा नाही, हे तपासून पाहण्यास सांगितले.जुमडे यांच्या तक्रारीवरून पोलीस विभागाने सपकाळ व इतरांविरुद्ध एफआयआर नोंदविला नाही. त्यामुळे जुमडे यांनी जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यात सपकाळ व इतरांना प्रतिवादी करण्यात आले आहे. २७ नोव्हेंबर २०१४ रोजी जेएमएफसी न्यायालयाने प्रतिवादींविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगून सुनावणी तहकूब केली होती. तसेच, २ जानेवारी २०१५ रोजी जुमडे यांची या आदेशावर पुनर्विचार करण्याची विनंती अमान्य केली होती. परिणामी, जुमडे यांनी या दोन्ही आदेशांविरुद्ध उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी त्यांचा अर्ज मंजूर करून जेएमएफसी न्यायालयाने दोन्ही वादग्रस्त आदेश रद्द केले व वरीलप्रमाणे निर्णय दिला.१ जानेवारी २०१३ रोजी एका शिक्षिकेने जुमडे यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दिली होती. त्यानंतर चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवणारा अहवाल दिला होता. नागपूर विद्यापीठातील गटबाजीमुळे ही संपूर्ण कारवाई कट रचून करण्यात आली, असे जुमडे यांचे म्हणणे आहे. जुमडे यांच्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ