शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

सुमित बाजोरिया यांना हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 20:20 IST

राजकीय क्षेत्रात चांगले संबंध असलेले कंत्राटदार सुमित बाजोरिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जोरदार दणका दिला. बाजोरिया यांच्याकडे कंत्राट असलेल्या यवतमाळ येथील सिमेंट रोडचे बांधकाम नियमानुसार सुरू आहे किंवा नाही, याची सखोल चौकशी करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आला. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत बाजोरिया यांची बिले थांबविण्यात यावी व चौकशीमध्ये दोषी आढळून येणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करावी, असे सांगण्यात आले. चौकशी सुरू करण्यासाठी चार आठवड्याचा तर, चौकशी पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा वेळ देण्यात आला.

ठळक मुद्देसिमेंट रोडचे निकृष्ट बांधकाम : पीडब्ल्यूडी प्रधान सचिवांना चौकशी करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राजकीय क्षेत्रात चांगले संबंध असलेले कंत्राटदार सुमित बाजोरिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जोरदार दणका दिला. बाजोरिया यांच्याकडे कंत्राट असलेल्या यवतमाळ येथील सिमेंट रोडचे बांधकाम नियमानुसार सुरू आहे किंवा नाही, याची सखोल चौकशी करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आला. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत बाजोरिया यांची बिले थांबविण्यात यावी व चौकशीमध्ये दोषी आढळून येणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करावी, असे सांगण्यात आले. चौकशी सुरू करण्यासाठी चार आठवड्याचा तर, चौकशी पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा वेळ देण्यात आला.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी संबंधित जनहित याचिका मंजूर करून हा निर्णय दिला. बाजोरिया यांना ३९ कोटी रुपयांमध्ये बसस्थानक ते मारोती मंदिरपर्यंत चार पदरी सिमेंट रोड बांधण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. हा रोड ३.४५ किलोमीटर लांब आहे. रोडचे काम अत्यंत निकृष्टपणे केले जात आहे. तांत्रिक गोष्टी व सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आतापर्यंत बांधून झालेल्या रोडला भेगा पडल्या आहेत. त्यावरून बांधकाम नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट होते. तसेच, सुरक्षेची काळजी घेण्यात आली नसल्यामुळे एका कारचा गंभीर अपघात झाला. सिमेंट रोडचे काम तांत्रिक आहे. कामावर लक्ष ठेवण्यासाठी किमान दोन ते तीन पात्र अभियंत्यांची नियुक्ती करणे आवश्यक होते. परंतु, कामाच्या ठिकाणी एकही अभियंता उपस्थित राहत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याने या कामातील भ्रष्टाचाराविषयी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु, तक्रारींची दखल न घेता त्या अभियंत्याचीच बदली करण्यात आली, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. शशिभूषण वाहणे व अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी कामकाज पाहिले.सरकारला फटकारलेउच्च न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर राज्य सरकारने उत्तर दाखल करून बाजोरिया यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, सरकारच्या स्पष्टीकरणाने न्यायालयाचे समाधान झाले नाही. सरकार ठोस कारवाई करीत नसल्याची बाब लक्षात घेता न्यायालयाने जनहित याचिका मंजूर केली. याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य असल्याचे सरकारच्या निष्क्रिय भूमिकेवरून स्पष्ट होते, असे परखड निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयYavatmalयवतमाळ