शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

हायकोर्टाचा हटके दणका : एफआयआर रद्द करण्याच्या बदल्यात साफसफाई करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 20:19 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी एका फौजदारी प्रकरणात अत्यंत हटके आदेश दिला. एफआयआर रद्द करण्याच्या बदल्यात आरोपी व फिर्यादी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १५ दिवस रोज दोन तास प्रत्येकी १० हजार चौरस फूट जागेची साफसफाई करावी.

ठळक मुद्देफिर्यादी व आरोपीला अमरावती विद्यापीठात द्यावी लागेल सेवा

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी एका फौजदारी प्रकरणात अत्यंत हटके आदेश दिला. खंडणीसाठी मारहाण करणे व धमकी देणे या गुन्ह्यांचा समावेश असलेला एफआयआर रद्द करण्याच्या बदल्यात आरोपी व फिर्यादी यांनी संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात १५ दिवस रोज दोन तास प्रत्येकी १० हजार चौरस फूट जागेची साफसफाई करावी. तसेच, झाडांना पाणी देणे, उद्यानाची देखभाल करणे इत्यादी कामे करावीत असे उच्च न्यायालयाने सांगितले.न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव यांनी प्रकरणावर निर्णय दिला. अहफाज अहमद एजाज अहमद असे आरोपीचे तर, अजहर खान अफजल खान असे फिर्यादीचे नाव आहे. या दोघांनी आपसात तडजोड केल्यानंतर एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात संयुक्त अर्ज दाखल केला होता. अजहर खानला रागाच्या भरात मारहाण केली व धमकी दिली. त्याच्यासोबत कोणतेही वैर नाही असे आरोपी अहफाजचे म्हणणे होते. तसेच, अजहर खान याने तडजोड करून वाद संपवल्याचे व आरोपी अहफाजविरुद्ध आता काही तक्रार नसल्याचे सांगितले होते.राज्य सरकारने या अर्जाला जोरदार विरोध केला. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी तपासाकरिता शक्ती व वेळ खर्च केला. त्यामुळे हा एफआयआर विनाशर्त रद्द करणे योग्य होणार नाही याकडे सरकारने न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाला सरकारची बाजू पटली. परिणामी, न्यायालयाने हा हटके आदेश दिला. विद्यापीठाचे कुलसचिवांनी अर्जदारांकडून संबंधित कामे करून घ्यावीत. त्यांच्या कामावर लक्ष ठेवावे व १५ दिवसानंतर न्यायालयात अहवाल सादर करावा असे निर्देशदेखील न्यायालयाने दिले आहेत. तसेच, अर्जदारांनी या आदेशाचे पालन केले तरच एफआयआर रद्द होईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सरकारतर्फे अ‍ॅड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.अशी आहे घटनाफिर्यादी मजहर खानच्या तक्रारीनुसार, ही घटना २४ जून २०१६ रोजी रात्री १२ च्या सुमारास घडली. खान मोटरसायकलने घरी जात होता. दरम्यान, आरोपी अहफाजने त्याला नागपुरी गेटजवळ थांबवले. त्याला मारहाण करून ११ लाख रुपयाची खंडणी मागितली. तसेच, पैसे न दिल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे खानने नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAmravatiअमरावतीuniversityविद्यापीठ