शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थिनीला हायकोर्टात दिलासा

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 29, 2023 15:42 IST

अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरविले

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरविल्यामुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थिनीला दिलासा मिळाला. या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांनी निर्णय दिला.

सृजनी घारट असे विद्यार्थिनीचे नाव असून ती नागपूर येथील रहिवासी आहे. तिला दोन आठवड्यात माना-अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करा, असा आदेश न्यायालयाने नागपूर विभागीय पडताळणी समितीला दिला आहे. या समितीने सृजनीच्या वडीलांना ३० नोव्हेंबर २००६ रोजी अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी केले आहे. ते प्रमाणपत्र अद्याप कायम आहे. तसेच, सृजनीच्या रक्तसंबंधातील इतर नातेवाईकांनाही वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. असे असताना या समितीने २ नोव्हेंबर २०२२ रोजी सृजनीला अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारले होते. तसेच, तिचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र जप्त केले होते.

सृजनी मुळ चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्यामुळे तिने त्याच जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवायला पाहिजे, असे समितीचे म्हणणे होते. त्याविरुद्ध सृजनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ती याचिका मंजूर करून समितीचा वादग्रस्त निर्णय रद्द केला व सृजनीला वैधता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरविले. सृजनीतर्फे ॲड. संतोष चांडे यांनी कामकाज पाहिले

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयdoctorडॉक्टरStudentविद्यार्थी