शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : नागपुरातील यश बोरकर खून प्रकरणावर अंतिम सुनावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:51 IST

नागपूर शहरातील बहुचर्चित यश बोरकर खून प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गुरुवारपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांचे न्यायपीठ हे प्रकरण ऐकत आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील बहुचर्चित यश बोरकर खून प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गुरुवारपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांचे न्यायपीठ हे प्रकरण ऐकत आहे.संतोष रामदास काळवे (२६) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा दापोली (काळवे), ता. मालेगाव, जि. वाशीम येथील रहिवासी आहे. त्याने दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय निरागस बालक साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण केले व त्यानंतर त्याचा निर्दयीपणे खून केला. सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. तसेच, आरोपीने त्याच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे.आरोपी नागपुरातील खापरी येथे भाड्याच्या खोलीत राहून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करीत होता. पीडित बोरकर कुटुंबही खापरीतच राहते. आरोपीची बोरकर कुटुंबाशी व यशसोबत चांगली ओळख होती. त्याने याचाच गैरफायदा घेऊन यशचा विश्वासघात केला. १० जून २०१३ रोजी यश घराजवळच्या परिसरात मित्रांसोबत खेळत होता. दरम्यान, आरोपी मोटरसायकलने तेथे गेला व त्याने यशला चिप्स व कोल्डड्रिकचे आमिष दाखवून सोबत चलण्यास सांगितले. आरोपी ओळखीचा असल्यामुळे यश बेफिकीर होऊन त्याच्या मोटरसायकलवर बसला. त्यानंतर आरोपीने यशला मिहान उड्डाणपुलाच्या खाली नेले व तेथे त्याचा काँक्रीटच्या दगडाने ठेचून खून केला. आरोपीने यशला ठार मारण्यासाठी त्याच्यावर २२ वेळा दगडाने वार केले. त्यानंतर आरोपीने यशच्या वडिलाला जावेद खान या नावाने चारदा मोबाईल कॉल करून मुलगा पाहिजे असल्यास दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. त्यामुळे प्रचंड घाबरलेल्या यशच्या वडिलाने सोनेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. आरोपीतर्फे अ‍ॅड. संतोष चांडे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. संजय डोईफोडे व अ‍ॅड. कल्याणी देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMurderखून