शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : वकिलाला मारहाण केल्याने धंतोली पोलिसांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:59 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माजी सरकारी वकिलाला अमानुष मारहाण करण्याच्या प्रकरणात राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त व धंतोली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देउत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माजी सरकारी वकिलाला अमानुष मारहाण करण्याच्या प्रकरणात राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त व धंतोली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मुकुंद मधुकर एकरे असे पीडित वकिलाचे नाव आहे. एकरे यांच्याविरुद्ध कौटुंबिक वादाची तक्रार दाखल झाल्यानंतर धंतोली पोलिसांनी गेल्या ६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री त्यांच्या घरात अवैधपणे प्रवेश केला. दरम्यान, पोलिसांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली. तसेच,घरातून ओढत बाहेर काढले व पोलीस व्हॅनमध्ये दीड तास कोंबून ठेवले. त्यांचा मोबाईल फोन हिसकावून त्यातील या अवैध कारवाईचे रेकॉर्डिंग डीलिट केले. त्यामुळे एकरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी मानवाधिकारांचे उल्लंघन केले. परिणामी, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी व दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी एक लाख रुपये भरपाई मिळण्याची मागणीही केली आहे. एकरे यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिलDhantoliधंतोलीPolice Stationपोलीस ठाणे