शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मदन येरावार यांच्याविरुद्ध सक्तीची कारवाई करण्यास हायकोर्टाची मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 20:44 IST

बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्याच्या मालकीचा भूखंड विकण्याच्या प्रकरणामध्ये यवतमाळचे पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह एकूण १४ आरोपींना शुक्रवारी दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित आरोपींविरुद्ध कोणतीही सक्तीची कारवाई करण्यात येऊ नये असा अंतरिम आदेश राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देचित्तरंजन कोल्हे यांनाही दिलासाएफआयआर रद्द करण्यासाठी अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्याच्या मालकीचा भूखंड विकण्याच्या प्रकरणामध्ये यवतमाळचे पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह एकूण १४ आरोपींना शुक्रवारी दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित आरोपींविरुद्ध कोणतीही सक्तीची कारवाई करण्यात येऊ नये असा अंतरिम आदेश राज्य सरकारला दिला.अन्य आरोपींमध्ये चित्तरंजन कोल्हे, जयश्री ठाकरे, विजयश्री कारेकर, जयंत कोल्हे, राजश्री देवतळे, तेजश्री थुटे, दिलीप कोल्हे, अर्चना कोल्हे, आशिष कोल्हे, वैशाली कोल्हे, अमोल कोल्हे, शीतल धोटे व अमित चखानी यांचा समावेश आहे. या  प्रकरणात अवधूतवाडी पोलिसांनी गेल्या १६ मे रोजी एकूण १७ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४२६, ४६५, ४६८, ४७१, १२०-ब, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. वरील १४ आरोपींनी त्यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अर्जावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता दोघांनाही अंतरिम दिलासा दिला. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून अर्जावर १९ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले.आयुषी देशमुख असे फिर्यादीचे नाव असून त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित भूखंड त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. भूखंडाची अवैधपणे विक्री करण्यात आल्यानंतर त्यांनी आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी पोलीस विभागाकडे तक्रारी दिल्या होत्या. परंतु, त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. त्या न्यायालयाने गेल्या १४ मे रोजी तक्रार मंजूर करून आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला. त्यानुसार, पोलिसांनी संबंधित एफआयआर नोंदवला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMadan Yerawarमदन येरावार