शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा निर्णय : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच खरा संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 20:01 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाच्या नवीन धर्मादाय संस्थेला नोंदणी मिळण्यासाठी नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी खारीज केली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे मून यांना दणका बसला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच खरा संघ असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देनवीन नोंदणीची याचिका खारीज : याचिकाकर्ते जनार्दन मून यांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाच्या नवीन धर्मादाय संस्थेला नोंदणी मिळण्यासाठी नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी खारीज केली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे मून यांना दणका बसला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच खरा संघ असल्याचेही स्पष्ट झाले आहे.२२ डिसेंबर २००५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार नावामध्ये ‘राष्ट्रीय’ शब्दाचा समावेश असलेल्या संस्थेला नोंदणी देता येत नाही. तसेच, नावावरून एखादी धर्मादाय संस्था सरकारी असल्याचे संकेत मिळत असल्यास, तिलाही नोंदणी देता येत नाही. संस्था नोंदणी कायदा-१८६० मधील कलम ३-ए मध्ये यासंदर्भात तरतूद आहे. तसेच, या तरतुदीनुसार अशी संस्था स्थापन करण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मून यांनी हे दोन निकष पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नोंदणी दिली जाऊ शकत नाही असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.मून यांनी त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी करण्यासाठी सुरुवातीला धर्मादाय कार्यालयात अर्ज दाखल केला होता. ४ आॅक्टोबर २०१७ रोजी सहायक धर्मादाय आयुक्तांनी वरील दोन निकषांच्या आधारावर त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्या आदेशाला मून यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. संबंधित परिपत्रक संस्थेच्या नावात ‘राष्ट्रीय’ शब्द वापरण्यास मनाई करीत नाही. तसेच, सध्या कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे सहायक धर्मादाय आयुक्तांचा वादग्रस्त आदेश रद्द करून आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नोंदणी देण्यात यावी असे मून यांचे म्हणणे होते. याशिवाय त्यांनी परिपत्रकाच्या वैधतेलाही आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने त्यांचे सर्व मुद्दे अमान्य केले. मून यांच्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले, मध्यस्थांतर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर तर, सरकारतर्फे अ‍ॅड. आनंद देशपांडे यांनी बाजू मांडली.प्राधिकाऱ्याला नोंदणी नाकारण्याचा अधिकारसंस्था नोंदणी कायदा-१८६० मधील कलम ३-ए अंतर्गत कार्य करणाऱ्या प्राधिकाऱ्याला विशिष्ट नावाच्या संस्थेला नोंदणी नाकारण्याचा अधिकार आहे. ही तरतूद घटनाबाह्य असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिलेला आदेश रद्द करण्याचे काहीच ठोस कारण दिसून येत नाही असे मत उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ