लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात पुलवामा आतंकवादी हल्ल्यानंतर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील सर्व रेल्वेस्थानक, विमानतळासह गर्दीच्या परिसरात पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देऊन कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.नागपूर शहरातील प्रमुख प्रवेश मार्गांवर जागोजागी नाक्याजवळ आणि काही अंतरावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्धा मार्गावर विमानतळाजवळ तपासासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. रात्री ८ नंतर शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांना त्यांच्या क्षेत्रात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील निर्जन परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. बाजार, गर्दीची ठिकाणे आणि मॉल्समध्ये साध्या वेशातील पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.प्रमुख मार्गावर पोलिसांची नजरसहपोलीस आयुक्त रवींद्र कदम म्हणाले, पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टची स्थिती आहे. नागपुर शहरातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळ, रेल्वेस्थानकाच्या आजूबाजूला पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वेस्थानक आणि विमानतळाकडील रस्त्यांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. शहरातील बाजार आणि मॉल्समध्येही पोलीस तैनात करण्यात आले आहेत.शीघ्र कृती पथक तैनातडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) शीघ्र कृती पथकाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीआयएसएफ जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून तीन पाळ्यात गस्त वाढविण्यात आली आहे. रडारच्या परिसरावर लक्ष देण्यात येत आहे. सर्व एअरलाईन्सच्या टीम संशयित हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. सीआयएसएफची एक चमू साध्या वेशात तैनात करण्यात आली आहे. विमानतळावरील आत जाण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर, शेड परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
नागपूर शहरात हाय अलर्ट जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:24 IST
देशभरात पुलवामा आतंकवादी हल्ल्यानंतर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील सर्व रेल्वेस्थानक, विमानतळासह गर्दीच्या परिसरात पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देऊन कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
नागपूर शहरात हाय अलर्ट जारी
ठळक मुद्देजागोजागी नाकाबंदी, वाहनांची तपासणी जोरातरेल्वेस्थानक, विमानतळावर कडेकोट बंदोबस्तगर्दीचे परिसर, मॉलमध्ये साध्या वेशातील पोलीस तैनात