शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘ते सारे’ मराठा नेतृत्वाचे अपयश लपविण्यासाठीच

By admin | Updated: October 6, 2016 02:46 IST

मराठा व दलित-आंबेडकरी समाजाची वैचारिक दैवते सारखी आहेत. त्यांच्यात जातीच्या विषयावरून संघर्ष शक्यच नाही.

प्रज्ञा दया पवार : विशेष मुलाखतीत साहित्य ते समाजाचे रोखठोक विश्लेषणशफी पठाण  नागपूरमराठा व दलित-आंबेडकरी समाजाची वैचारिक दैवते सारखी आहेत. त्यांच्यात जातीच्या विषयावरून संघर्ष शक्यच नाही. व्यभिचार ही वृत्ती आहे नि ती कुठल्याच विशिष्ट जातीची नसते. स्वातंत्र्या नंतरची अनेक वर्षे सलग सत्तेत राहिलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी आपल्या समाजाच्या हितासाठी काहीच केले नाही. आता या समाजातील तरुण आपल्याला जाब विचारतील ही भीती त्यांना सतावत आहे. आपले अपयश लपविण्यासाठीच कोपर्डीसारख्या विषयांना हवा देऊन तरुणाईची माथी भडकवली जात आहेत, असे प्रखर मत प्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केले. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत साहित्य ते समाजाचे रोखठोक विश्लेषण करताना त्यांनी अनेक विषयावर आपले बेधडक विचार मांडले. कोपर्डीच्या प्रकरणावरून आज रान माजले आहे. दलित विरुद्ध मराठा असे चित्र रंगवले जात आहे. पण, ते खरे नाही. या दोन्ही समाजामध्ये कुठलाही संघर्ष नाही. जी घटना घडली ती निश्चितच निंदनीय आहे. पण, त्यासाठी कुठल्याही एका समाजाला दोषी धरता येणार नाही. मराठा समाजाची अनेक मंडळी सत्तेत असताना त्यांनी भांडवलदारांना सोयीचे होईल असे धोरण राबविले. बक्कळ पैसा कमावला.पण, समाजाच्या हितासाठी काहीच केले नाही. आता दलितांच्या आरक्षणाकडे बोट दाखवले जात आहे. त्यांच्या आरक्षणाचे प्रमाण जास्त आहे म्हणून तुम्हाला आरक्षण मिळत नाही, असे विचार पेरले जात आहेत, असा आरोप प्रज्ञा पवार यांनी केला. पुरस्कार वापसीचा निर्णय योग्यचदेशात व राज्यात नवीन सरकार आल्यापासून धर्मांध शक्तींना बळ मिळत आहे. यातूनच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध कुणी बोलले तर त्याला राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे. मी या वृत्तीचा निषेध करण्यासाठी राज्य शासनाचे पुरस्कार परत केले तेव्हा मलाही सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला. पण, मला त्याची पर्वा नाही. नामदेव ढसाळांचे विचार माझ्या धमन्यांमध्ये वाहत असतात. या विचारांनीच मला पुरस्कार परत करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यावर आता काहीही चर्चा होत असली तरी माझा तो निर्णय योग्यच होता. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीचाही राजकीय आखाडाअखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचाला माझा विरोध नाही. मी आधी अशा दोन संमेलनांवर बहिष्कार घातला असला तरी त्याला काही तत्कालीन कारणे होती. खरं म्हणजे भाषा आणि संस्कृतीच्या विकासाच्या दृष्टीने संमेलन हा चांगला पर्याय आहे. पण, या संमेलनासाठी जी निवडणूक होते ती आता राजकीय स्टाईलने लढली जाते. राजकीय पक्षांच्या घोषणापत्राप्रमाणे आपला परिचय व कार्य रंगीत कागदावर छापून मतदारांना पाठवले जाते. निवडून येण्यासाठी मतदारांना विनवण्या कराव्या लागतात. कुठल्याही विचाराधिष्ठित लेखकाला अशी विवशता मान्य नसते. म्हणून चांगले साहित्यिक या निवडणुकीच्या आखाड्यात उतरत नाहीत, याकडेही प्रज्ञा पवार यांनी लक्ष वेधले.