शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या संस्कृत विद्यापीठाचे ‘हायटेक’ पाऊल, ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:35 IST

राज्यातील इतर विद्यापीठांप्रमाणेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठानेदेखील तंत्रज्ञानाची कास पकडली आहे. परीक्षेच्या निकालांना गती मिळावी व पारदर्शकता वाढावी, यासाठी संस्कृत विद्यापीठात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देनिकालांची गती वाढणार

ऑनलाइन लोकमतनागपूर : राज्यातील इतर विद्यापीठांप्रमाणेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठानेदेखील तंत्रज्ञानाची कास पकडली आहे. परीक्षेच्या निकालांना गती मिळावी व पारदर्शकता वाढावी, यासाठी संस्कृत विद्यापीठात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला सुरुवात झाली आहे. विद्यापीठात परीक्षांची संख्या फारशी नसली तरी या प्रणालीमुळे एक नवी सुरुवात झाली आहे, अशी माहिती प्रभारी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली आहे.मागील वर्षी संस्कृत विद्यापीठ ‘नॅक’च्या मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे गेले होते. मूल्यांकनाच्या पहिल्या टप्प्यातच बी++ श्रेणी बहाल करण्यात आली होती. या श्रेणीत आणखी सुधारणा व्हावी यासाठी विद्यापीठाकडून विविध सुधारणांवर भर देण्यात येत आहे.नागपूर विद्यापीठाने ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाची प्रणाली यशस्वीपणे राबविली व त्यामुळे राज्यात सर्वात अगोदर निकाल देणारे विद्यापीठ बनले. संस्कृत विद्यापीठातदेखील ही प्रणाली सुरू करावी, असा प्रस्ताव होता. यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सविस्तर चर्चादेखील झाली होती व परिषदेची मंजूरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली.संस्कृत विद्यापीठात फारशा परीक्षा नाहीत व साधारणत: पाच हजार विद्यार्थी परीक्षेला बसतात. यातील काही परीक्षांना ५०० हून अधिक विद्यार्थी असतात. सद्यस्थितीत सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘आॅनस्क्रीन’ होत नसून केवळ जास्त विद्यार्थीसंख्या असलेल्यांचेच मूल्यांकन या पद्धतीने होत आहे. याचा भविष्यात विस्तार करण्यात येईल. या प्रणालीमुळे पारदर्शकता आणि मूल्यांकनातील सुटसुटीतपणादेखील वाढेल, असे डॉ.येवले यांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर