शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट : नागपुरात दलालांचे मजबूत नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 21:18 IST

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा तपास करीत असलेल्या धंतोली पोलिसांना शहरात या रॅकेटमधील दलालांचे मजबूत नेटवर्क असल्याची माहिती हाती आली आहे. पोलीस आणि पांढरपेशा लोकांच्या मदतीने सुरु असलेल्या देहव्यापाराच्या या धंद्यात दलाल आणि त्याच्याशी संबंधित लोकं मालामाल होत आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटची प्रमुख सूत्रधार प्रणिता जयस्वाल हिने शहरात सक्रिय असलेल्या अनेक दलालांची नावे उघड केली आहे. पोलिसांनी प्रणिता व तिचा साथीदार निखील शेंडे याला तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत घेतले आहे.

ठळक मुद्देसूत्रधार प्रणिताची विचारपूस, अनेक दलालांची नावे समोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा तपास करीत असलेल्या धंतोली पोलिसांना शहरात या रॅकेटमधील दलालांचे मजबूत नेटवर्क असल्याची माहिती हाती आली आहे. पोलीस आणि पांढरपेशा लोकांच्या मदतीने सुरु असलेल्या देहव्यापाराच्या या धंद्यात दलाल आणि त्याच्याशी संबंधित लोकं मालामाल होत आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटची प्रमुख सूत्रधार प्रणिता जयस्वाल हिने शहरात सक्रिय असलेल्या अनेक दलालांची नावे उघड केली आहे. पोलिसांनी प्रणिता व तिचा साथीदार निखील शेंडे याला तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत घेतले आहे.झोन दोनचे डीसीपी चिन्मय पंडित यांनी गुरुवारी रात्री वर्धा रोडवरील केपीएन हॉटेलवर धाड टाकून या टोळीचा भंडाफोड केला होता. पोलिसांना आरोपीकडे दोन रशियन तरुणी सापडल्या होत्या. पोलीस प्रणिताचा जप्त केलेला मोबाईल आणि इतर माहितीच्या आधारावर तिच्या संपर्कांची माहिती मिळवित आहे. आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आलेल्या माहितीवरून पोलीसही आश्चर्यचकित आहे.सूत्रानुसार प्रणितासारखे शहरात डझनावर देहव्यापाराचे मोठे अड्डे चालत आहेत. या टोळीसाठी स्थानिक तरुणींसह मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या मुलीही काम करतात. अनेक टोळ्यांचे पोलिसांशी लागेबांधे आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई केली जात नाही. शहरातील देहव्यापारात प्रणितासारख्या अनेक आहेत. त्यांचे नेटवर्क अनेक राज्यांमध्ये पसलेला असतो. अनेक ग्राहक त्यांची सेवा घेण्यासाठी येथे येतात. विशेष ग्राकांसाठी विदेशी तरुणींना बोलावले जाते. स्थानिक तरुणी दोन-चार हजारात मिळते. परंतु विदेशी तरुणींसाठी ग्राहक २० ते २५ हजार रुपये सुद्धा खर्च करतो. धंतोली पोलिसांना मिळेलेल्या तरुणी या अनेकदा नागपुरात आल्या असल्याचे सांगितले जाते. देहव्यापारात असलेल्या त्यांच्या काही मैत्रिणी अगोदर येथे आल्या होत्या. त्यांच्या माध्यमातूनच दोघीही प्रणिताकडे आल्या. प्रणिताने आठवडाभरापूर्वीच त्याना करारावर आणले. प्रणिताने त्यांना आपल्या घरीच ठेवले होते. ग्राहक मिळाल्यावर हॉटेलमध्ये खोली बुक करून तरुणीला पाठवत होती.सूत्रानुसार प्रणिता व तिच्या सारखे दलाल शहरातील अनेक हॉटेलशी जुळलेले आहे. तिथे सेवा दिल्यावर ग्राहकांकडून मोठी रक्कम वसूल करणे सोपे जाते. या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशीही दलालांचे चांगले संबंध आहेत. प्रणिताने यालाही दुजोरा दिला आहे.यामुळे अनेकदा ग्राहक स्वत:च खोली बुक करून प्रणिताकडून तरुणी बोलवून घेतात. पोलिसांनी रशियन तरुणींकडून आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र सुद्धा जप्त केले आहे.प्राथमिक तपासात त्यांचे दस्तावेज बोगस नसल्याचे दिसून येते. स्थानिक व्यक्तीच्या मदतीने दस्तावेज तयार करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या तरुणींना पासपोर्टची माहिती दिलेली नाही. पोलीस पासपोर्ट जप्त करतील या भितीने कदाचित त्या काही सांगायला तयार नाहीत.समोर आलीत दलालांची नावेसूत्रानुसार या प्रकरणातील तपासात माया, मनोज, बंटी यांच्यासह शहरात सक्रिय असलेल्या अनेक दलालांची नावे उघडकीस आली आहेत. अनेक दलाल एकमेकांशीही जुळलेले आहेत. काही ग्राहक अल्पवयीन मुलींचीही मागणी करतात. दिघोरी येथील माया अल्पवयीन मुलींकडून देह व्यापार करते. पोलीसही त्यांचा शोध घेत आहे.अनेक राज्यांशी संपर्कपोलिसांना प्रणिताच्या मोबाईलमधून कोलकाता, केरळ, गुजरातसह अनेक राज्यातील मोबाईल नंबर सापडले आहेत.अनेक नंबरवर प्रणिताचे नियमित बोलणे झाले आहे. तिने त्या नंबरवर तरुणीचे फोटोही पाठवले आहेत. अशा लोकांशी संपर्क साधून त्यांना विचारपूस करण्यासाठी बोलवण्यात आले आहे. त्यांची विचारपूस केल्यानंतर प्रणिताचे खरे रुप आणखी उघड होऊ शकते.

पुन्हा निघाला बाजीरावचा जिन्नया प्रकरणातील तपसादरम्यान ‘बाजीराव’चाही उल्लेख झाला. याबाबत प्रणिता काहीही सांगत नाही आहे. या प्रकरणात शहर पोलिसातील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मिलिभगत आहे. त्यामुळेच त्यांनी हा प्रकार उघडकीस येऊ दिला नाही. सामाजिक सुरक्षा शाखा (एसएसबी) च्या माध्यमातून वसुली आणि असामाजिक कामे चालवली जात होती. यात सहभगी अधिकारी-कर्मचारी आजही या विभागात आहेत. त्यामुळेच शहरात सर्रासपणे देहव्यापार सुरु आहे. प्रणिताची सखोल चौकशी झाल्यास अनेकांची बोलती बंद होऊ शकते.

 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाnagpurनागपूर