शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

इथे रावणच आहे उदरनिर्वाहाचे साधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:44 IST

रावणदहन नाही तर रावणाचे पुतळे नाहीत आणि त्यामुळे, त्यापासून होणारे आर्थिक उत्पन्नही नाही, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देपोटाची आग कोण विझविणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा होणारा विजयादशमी महोत्सव रावणदहनासाठी ओळखला जातो. कोरोनामुळे यंदा हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्याचा परिणाम रावणावर निर्भर असलेल्या कारागीर वर्गावर होणार आहे. रावणदहन नाही तर रावणाचे पुतळे नाहीत आणि त्यामुळे, त्यापासून होणारे आर्थिक उत्पन्नही नाही, अशी स्थिती आहे.बहुसांस्कृतिक देशात प्रत्येक सणोत्सव सर्वसामान्यांना रोजगाराचे प्रमुख कारण असतात. मात्र, यंदा हे सर्वच रोजगार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रामनवमी असो, गणेशोत्सव असो, धम्मचक्र प्रवर्तन दिन असो वा अन्य सर्वच धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे, या उत्सवांवर रोजीरोटी कमावणारे कारागीर रिकाम्या हाताने बसले आहेत. रोज कमवू तर रोज खाऊ, अशा स्थितीत हा वर्ग असतो. त्यातच सणोत्सवाच्या काळात मिळणारा रोजगार पुढच्या काही महिन्यांसाठीच्या उदरनिर्वाहाचे साधन असतात. मात्र, यंदा ते सगळे हिरावले गेले आहेत. महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले खेमकरणसिंग बिनवार हे रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांचे पारंपरिक पुतळे बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या ५०-६० वर्षापासून अखंडितपणे हे कार्य ते करतात. त्यासाठी त्यांच्याकडे १५ ते २० जणांची टीम आहे. जून महिन्यापासून हे कार्य सुरू होते. दरवर्षी ३०च्या वर रावणाचे ऑर्डर्स त्यांच्याकडे असतात. मात्र, यंदा अद्याप एकही ऑर्डर आलेली नाही. २५ ऑक्टोबरला विजयादशमी सोहळा आहे. त्यामुळे, बिनवार आणि इतर कारागीर चिंतेत बसले आहेत.मेळाव्यात होणारी खेळभांड्यांची विक्री रखडलीशहरात कस्तुरचंद पार्क, चिटणीस पार्क, रेशीमबाग, हनुमाननगर, श्रीकृष्णनगर आणि इतर प्रमुख मैदानांमध्ये रावणदहनाचे जाहीर कार्यक्रम होत असतात. त्यानिमित्ताने जमणाऱ्या मेळाव्यात छोटे-मोठे खेळभांड्यांची विक्री करणारे आपला व्यवसाय करतात. त्यात लाकडी तलवार, दशानन मुख, धनुष्य, बाण आदींचा समावेश असतो. यंदा हे सगळे होणार नाही.सांस्कृतिक कार्यक्रमांना ब्रेकमेळावा म्हटला की सांस्कृतिक कार्यक्रम आलेच. त्यात रामलीला, लघुनाट्य, नृत्य, युद्ध प्रात्यक्षिके, गायन यांचा समावेश असतो. यंदा मात्र, मेळावाच भरणार नसल्याने या सगळ्या कार्यक्रमांना ब्रेक लागणार आहे. त्याचा परिणाम या कार्यक्रमांकडून अपेक्षित असलेली आर्थिक गरज पूर्ण होणार नाही.छोटेखानीच का असेना परवानगी द्यावी - विक्की वानखेडेकोरोनाची धास्ती प्रचंड आहे. मात्र, पोटाची खळगी भरणेही आहेच. मोठे पुतळे न बनविता पाच ते १५ फुटांचे पुतळेच बनवण्याची परवानगी दिली तर आमची विवंचना संपेल. फिजिकल डिस्टन्सिंगने सोहळे साजरे करता येतील. मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन पाठविले आहे, अशी माहिती कारागीर विक्की वानखेडे यांनी दिली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस