लोकमत न्यूज नेटवर्कसुमेध वाघमारे/दयानंद पाईकरावनागपूर : रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये जेवण करीत असाल तर सतर्क होण्याची वेळ आली आहे. यात ज्यांचे किचन आत आहे ते अस्वच्छ, मळकट व जाळ्यांनी भरलेली आहेत तर ज्यांची बाहेर आहेत ती रस्त्याला खेटून आहेत. यामुळे पोळ्या लाटण्यापासून भाजीला फोडणी देण्याची कामे उघड्यावर होतात. २४ तास वाहत्या रस्त्यांची धूळ, घाण त्यात पडते. यातच दूषित पाणी, भेसळयुक्त सामग्री आणि सडलेल्या भाज्यांचा उपयोग होत असल्याने हे खाद्यपदार्थ आरोग्याला धोकादायक ठरणारी आहेत. आजार देणारे हे हॉटेल्स सर्वांदेखत सुरू असतानाही प्रशासन मात्र मूकदर्शक बनले आहे.सोमवारी ‘लोकमत’ चमूने या गंभीर प्रकाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’ करून हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे या हॉटेल्सचालकांचे चांगलेच फावत असल्याचे वास्तव समोर आले.एकाच ठिकाणी ४० वर हॉटेल्समध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या समोरील पुलाखालील साधारण ४० वर छोटी-मोठी हॉटेल्स आहेत. नागपुरात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येत हॉटेल्स असणारे हे एकमेव ठिकाण आहे. परंतु यातील दोन-चार हॉटेल्स सोडल्यास इतर सर्व हॉटेल्समध्ये अस्वच्छता, घाण, उघड्यावर खाद्यपदार्थ, उघडे किचन असेच दृश्य ‘लोकमत’चमूला दिसून आले. जिथे उभे राहणेही किळसवाणे आहे, तिथे लोक पैसे देऊन जेवत होती.बहुसंख्य हॉटेल्सचे किचन रस्त्यावरचरेल्वे स्थानकासमोरील बहुसंख्य हॉटेल्स चालकांनी खाद्यपदार्थ शिजविण्यासाठी रस्त्यावरच भट्टी लावलेली आहे. त्यामुळे फोडणी देताना सगळे पदार्थ रस्त्याच्या शेजारीच ठेवून सगळी प्रक्रिया पार पाडते. वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ उडून अन्नात मिसळते. हेच धुळीत शिजविलेले अन्न हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या थाळीत येते.भाज्यापासून अन्नही उघड्यावरचरेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये काऊंटरवर दर्शनी भागात फुलकोबी, पत्ताकोबी, वांगे, टमाटर या भाज्यांचे उघड्यावरच प्रदर्शन लावले जाते. दिवसभर रस्त्यावरील धूळ उडून या भाज्यांवर साचते. मग एखादा ग्राहक आला की लगेच त्याच्यासमोर ताजी चिरलेली भाजी करण्याचा आव आणून न धुताच या भाज्या कापून त्यांना फोडणी दिली जाते. शिजलेला भात फूटपाथवरएका हॉटेलमध्ये तर कमालीचा बेजबाबदारपणा पाहावयास मिळाला. या हॉटेलमधील कर्मचारी शिजण्यासाठी टाकलेल्या भातातील पाणी काढून टाकण्यासाठी एका गाळणीत शिजलेला भात टाकला. ही गाळणी तशीच फूटपाथवर ठेवली. पाणी निघून जाईपर्यंत हा भात तसाच फूटपाथवर होता. त्याच्या शेजारून लोकांची ये-जा सुरू होती.मद्यपींसाठी विशेष सोयरेल्वे स्थानकासमोरील काही हॉटेल्समध्ये मद्यपींसाठी विशेष सोय केली आहे. ही माहिती देण्यासाठी हॉटेलसमोरच काही माणसांना उभे केले आहे. यामुळे ही हॉटेल्स मिनी बीअर बार झाली आहेत. काहीमध्ये लपूनछपून तर काहींमधून सर्रास दारू पिणारे दिसून आले.हॉटेलचा आत आणि बाहेरचा परिसरही अस्वच्छ
...येथे मिळतो विकतचा आजार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:18 IST
रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये जेवण करीत असाल तर सतर्क होण्याची वेळ आली आहे. यात ज्यांचे किचन आत आहे ते अस्वच्छ, मळकट व जाळ्यांनी भरलेली आहेत तर ज्यांची बाहेर आहेत ती रस्त्याला खेटून आहेत. यामुळे पोळ्या लाटण्यापासून भाजीला फोडणी देण्याची कामे उघड्यावर होतात. २४ तास वाहत्या रस्त्यांची धूळ, घाण त्यात पडते. यातच दूषित पाणी, भेसळयुक्त सामग्री आणि सडलेल्या भाज्यांचा उपयोग होत असल्याने हे खाद्यपदार्थ आरोग्याला धोकादायक ठरणारी आहेत.
...येथे मिळतो विकतचा आजार !
ठळक मुद्देलोकमत स्टिंग आॅपरेशनरस्त्यावर शिजते अन्नदूषित व उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे आरोग्य धोक्यातरेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्सचे धक्कादायक चित्र