शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तीन ठिकाणी हिमॅटोलॉजी सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:37 IST

रक्ताच्या विकारावरील उपचारासाठी राज्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेडिकल), पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हिमॅटोलॉजी सेंटर सुरू होणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार (एमओयू) नुकताच झाल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी शुक्रवारी नागपुरात केली.

ठळक मुद्देरक्ताच्या विकारावर उपचार व संशोधन : नागपुरात मेडिकलमध्ये होणार सेंटर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रक्ताच्या विकारावरील उपचारासाठी राज्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेडिकल), पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हिमॅटोलॉजी सेंटर सुरू होणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार (एमओयू) नुकताच झाल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी शुक्रवारी नागपुरात केली.संजय देशमुख यांनी सांगितले, या सेंटरला घेऊन हिमॅटोलॉजिस्ट डॉ. सविता रंगराजन नागपुरात आल्या आहेत. डॉ. रंगराजन या तीनही मेडिकलमध्ये सेंटरसाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी व मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहे. या सेंटरविषयी अधिक माहिती देताना डॉ. रंगराजन म्हणाल्या, या सेंटरला घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाशी सामंजस्य करार झालेला आहे. या सेंटरमध्ये हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकलसेलसाठी डे-केअर सेंटरची सोय असणार आहे. शिक्षण, संशोधन, माहिती संकलन व ‘क्लिनिकल ट्रायल’ हे या सेंटरचे मुख्य उद्देश असेल. या सेंटरसाठी लागणारा निधी हा राज्य सरकारसोबतच ‘कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सीब्लिटी’ (सीएसआर) फंडामधून गोळा केला जाईल. नागपूरमध्ये हे सेंटर सुरू झाल्यास याचा फायदा मध्यभारतातील रुग्णांना होईल. विशेषत: विदर्भातील सिकलसेलबाधित रुग्णांना या सेंटरमधून मोठी मदत मिळेल, असेही त्या म्हणाल्या.शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक आजारांवर अद्यावत उपचार होत असताना रक्ताच्या विकारावर उपचार होत नसल्याचे वास्तव आहे. रुग्णांना पुणे, मुंबई किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागायचे. परंतु आता ‘हिमॅटोलॉजी’ सेंटर सुरू होणार असल्याने याचा सर्वाधिक फायदा गरीब रुग्णांना होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञाच्या मते, हे सेंटर हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी आशेचे किरण ठरेल. या आजाराच्या रुग्णांच्या शरीरात रक्ताची गुठळी (क्लॉटिंग) तयार होत नाही. यामुळे जखम झाल्यानंतर तेथून सातत्याने रक्तस्राव होत राहतो. उपचार करूनही हा रक्तस्राव थांबत नाही. अखेर शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याने त्या रुग्णाचा मृत्यू ओढावतो. जगभरात आज जे काही मोजके आजार आहेत ज्यावर उपचार सापडलेला नाही त्यात हिमोफिलियाचा समावेश होतो. या आजारावर या सेंटरमध्ये संशोधन होऊन औषधोपचार होणार असल्याने रुग्णांना अमरावती किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही.

टॅग्स :Medicalवैद्यकीयnagpurनागपूर