शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत संक रॉक ते गेट वे ऑफ इंडिया अंतर हिमानीने अवघ्या ४३ मिनिटे ३८ सेकंदात गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 11:21 IST

सागरी किनारा नसताना अंबाझरीसारख्या तलावात सराव करून राज्यात सलग नऊ वर्षे अव्वल येण्याचा मान आंतरराष्ट्रीय जलतरणपटू हिमानी फडके हिने पटकावला आहे.

ठळक मुद्दे सलग नवव्यांदा चॅम्पियन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सागरी किनारा नसताना अंबाझरीसारख्या तलावात सराव करून राज्यात सलग नऊ वर्षे अव्वल येण्याचा मान आंतरराष्ट्रीय जलतरणपटू हिमानी फडके हिने पटकावला आहे. मुंबईत संक रॉक ते गेट वे ऑफ इंडिया असे ५ कि.मी. सागरी अंतर हिमानीने अवघ्या ४३ मिनिटे ३८ सेकंदात गाठून वेगवान जलतरणपटूचाही मान मिळविला. १६ वर्षांच्या हिमानीने वयाच्या आठव्या वर्षांपासून महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटने द्वारा सिंधुदुर्ग आणि मुंबईत होत असलेली ही स्पर्धा प्रत्येकवर्षी जिंकली हे विशेष.११ व्या वर्गात असलेल्या हिमानीने यंदा ५८ व्या राज्य सागरी जलतरणाच्या १६ ते २५ वर्षे गटात भाग घेतला होता. प्रचंड लाटा उसळत असताना खाऱ्या पाण्याची तमा न बाळगता तिने ४५० स्पर्धकांना मागे टाकले. पुरस्कारादाखल हिमानीला दोन हजार रोख, गौरवचिन्ह, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देण्यात आले. हिमानीचे सहकारी स्मिथ डोरलीकर व प्रणव लोहाळे यांनीदेखील लक्षवेधी कामगिरी केली आहे.स्मिथ डोरलीकरने ५ किमी अंतर ४३ मिनिटे ३ सेकंदात पार करीत दुसरे स्थान घेतले. शरयू फरतोडेने चौथे स्थान मिळविले.मूकबधिर जलतरणपटू प्रणव लोहाळे याने २ किमी अंतर १८ मिनिटात पार करीत दुसरे स्थान मिळविले. याच गटांत अक्षय नवले चौथ्या स्थानी राहिला.१३ वर्षे मुलींमध्ये प्रेरणा चापलेने पाचव्या स्थानावर आली. प्रशिक्षक संजय बाटवे यांच्या मार्गदर्शनात सर्व जलतरणपटू सराव करीत असून ते शार्क अँक्वेटिक स्पोर्टिंग असोसिएशनचे नियमित सदस्य आहेत.

टॅग्स :Swimmingपोहणे