शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गरजू रंगकर्मींना मदत पोहोचवण्यास सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:40 IST

नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेने स्व:बळावर नागपूरच्या रंगकर्मींना मदत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देनाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना आणि त्यामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने इतर सर्वसामान्य क्षेत्रातील नागरिकांप्रमाणेच चेहऱ्यावर रंग फासून ग्लॅमर जगतात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांचे मनोरंजन, प्रबोधन करणारे रंगकर्मी बेरोजगारीमुळे हवालदिल झाले आहेत. या रंगकर्मींची रसिकवर्गात प्रचंड क्रेज असली तरी ती क्रेज जगण्यास पुरेसी नाही. जगण्यासाठी पैसा लागतो आणि म्हणूनच लोकमतने कलावंत तगण्याची आणि माणूस म्हणून जगण्याची गरज यासारखे विषय हाताळत नाट्यपरिषद, सांस्कृतिक संचालनालय आणि राज्य व केंद्र सरकारकडे सवाल उपस्थित केला होता. या विषयाला सरकारात्मक प्रतिसाद देत नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेने स्व:बळावर नागपूरच्या रंगकर्मींना मदत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे.

नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे आणि इतर कार्यकारीणीच्या प्रयत्नांतून ही मदत पोहोचवली जात आहे. अ.भा. मराठी नाट्यपरिषदेने व्यावसायिक रंगकर्मींच्या जगण्याचा तात्पुरता प्रश्न सोडविण्यासाठी १ कोटी २० लाख रुपयाचा निधी गोळा करून तो गरजूंपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. विदर्भ, मराठवाडा येथील कलावंतांना स्थान नव्हते. या विषयावरही लोकमतने नाट्यपरिषदेचा अखिल भारतीय चेहरा संकुचित! अशा मथळ्याखाली विषय हाताळत नाट्यपरिषदेला धारेवर धरले होते. याच विषयाला धरून नाट्यपरिषदेचे उपक्रम उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आणि राज्यातील सर्वच शाखांना त्यांच्या त्यांच्या भागातील गरजू कलावंतांची यादी तयार करण्याचे आदेश नाट्यपरिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिले आहेत. नाट्यपरिषदेला उशीरानेच परंतु योग्य वेळेवर सुचलेल्या शहाणपणाने टाळेबंदीमुळे कोमेजलेल्या गरजू रंगकर्मींच्या चेहऱ्यावर हास्य उमटण्यास सुरुवात झाली आहे.

त्याअनुषंगाने नागपुरातील नागपूर व महानगर शाखेने अत्यंत हलाखीच्या परिस्थिती जगत असलेल्या रंगकर्मींची यादी नाट्यपरिषदेकडे पाठवली आहे आणि योग्य ती तपासणी केली जाऊन दोन-तीन टप्प्यात लवकरच मदत पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी नागपूर शाखेने त्याही पलिकडे जात स्व:प्रयत्नाने निधी गोळा करत नागपुरातील गरजू रंगकर्मींना मदत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. तसे एसएमएस रंगकर्मींच्या मोबाईलवर झळकत असल्याने पडत्या काळात अल्पसा का होईना, आधार मिळत असल्याने रंगकर्मी समाधान पावले आहेत.मनाकसंची पायपीट सुरूनागपुरातील रंगकर्मींना मदतीसाठी नागपुरातील प्रतिथयश रंगकर्मींनी एकत्र येत मराठी नाट्य कलावंत संघटना (मनाकसं) ही संघटना स्थापन केली आहे. संघटनेची कार्यकारीणी खंबीर अशा मदतीसाठी शहरातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री आणि धनाड्य व्यक्तींकडे पायपीट करत आहे. त्याचाच हा परिणाम म्हणून रंगकर्मींपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :Natakनाटक