शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना; सुमारे ८००० कोटींची गुंतवणूक होणार, २००० रोजगार निर्मिती

By शुभांगी काळमेघ | Updated: June 13, 2025 19:48 IST

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार

नागपूर :नागपूर शहरात सुमारे ८,००० कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करत हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामध्ये सामंजस्य करार झाला असून, हा ऐतिहासिक करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडला.

महाराष्ट्रात पहिलाच हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्पया कराराअंतर्गत मॅक्स एरोस्पेस नागपूरमध्ये २०२६ पासून हेलिकॉप्टर उत्पादन सुरु करणार आहे. आठ वर्षांमध्ये होणाऱ्या या प्रकल्पात सुमारे ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, २,००० लोकांना रोजगार संधी निर्माण होणार आहे. या उपक्रमामुळे नागपूरचे संरक्षण उत्पादन क्षेत्र अधिक मजबूत होणार असून, राज्य सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

  • रोटरी विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग या क्षेत्रासाठी हा प्रकल्प 'सेंटर ऑफ एक्सलन्स' म्हणून कार्य करेल.
  • प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
  • नागपूर विमानतळाजवळ प्रकल्प राबविल्यामुळे लोकेशन आणि लॉजिस्टिकचे प्रगत फायदे मिळतील.
  • महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून, यामुळे राज्य हे एरोस्पेस उद्योगासाठी एक केंद्रबिंदू म्हणून विकसित होईल.

“मॅक्स एरोस्पेसने महाराष्ट्र विशेषतः नागपूरची निवड केल्याचा आनंद आहे. राज्य शासन या प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा देईल. नागपूरमध्ये संरक्षण उत्पादनासाठी अनुकूल वातावरण असून, हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे.”- देवेंद्र फडणवीस,  मुख्यमंत्री 

“मी मूळचा महाराष्ट्रातील असून, या राज्यातच उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरमध्ये आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि आम्ही राज्य सरकारच्या सहकार्याने हेलिकॉप्टर उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेणार आहोत.”- भरत मलकानी, अध्यक्ष मॅक्स एरोस्पेस  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर