शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अवजड काम झाले सुकर : हायकोर्टातील बस्ता लिफ्टचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:09 IST

न्यायालयीन प्रकरणांच्या फाईल्सचे बस्ते पहिल्या माळ्यावर चढवणे व तेथून खाली उतरविणे या अवजड कामाकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विशेष लिफ्ट बसविण्यात आली आहे. त्या लिफ्टचे सोमवारी बस्ता कर्मचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या लिफ्टमुळे बस्ता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे‘एचसीबीए’चा बस्ता कर्मचाऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयीन प्रकरणांच्या फाईल्सचे बस्ते पहिल्या माळ्यावर चढवणे व तेथून खाली उतरविणे या अवजड कामाकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विशेष लिफ्ट बसविण्यात आली आहे. त्या लिफ्टचे सोमवारी बस्ता कर्मचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या लिफ्टमुळे बस्ता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.न्यायालयीन प्रकरणांच्या फाईल्सचे हजारावर बस्ते रोज वकिलांच्या कारमधून खाली उतरविणे व पहिल्या माळ्यावरील संबंधित न्यायालयांमध्ये पोहोचवून देणे आणि न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर ते बस्ते परत खाली आणून वकिलांच्या कारमध्ये ठेवून देणे या कामासाठी हायकोर्ट बार असोसिएशनने कर्मचारी नियुक्त केले आहेत. सपाट ठिकाणी चाकांच्या ट्रॉलीद्वारे फाईल्सचे बस्ते इकडून-तिकडे हलविले जातात. त्याचा बस्ता कर्मचाऱ्यांना त्रास होत नाही. त्यांचा खरा कस पायऱ्यांच्या मार्गाने तळमाळ्यावरून पहिल्या माळ्यावर व पहिल्या माळ्यावरून तळमाळ्यावर बस्ते हलविताना लागत होता. या अवजड कामामुळे त्यांना कंबर, गुडघे, पाठ व मानदुखीचे आजार जडले होते. त्यांचे रोज होणारे हाल पाहता संघटनेने बस्त्यांसाठी विशेष लिफ्ट लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, दक्षिणेकडील इमारतीमधील पहिल्या बार रुमपुढील पायऱ्याच्या ठिकाणी विशेष लिफ्ट बसविण्यात आली आहे. लिफ्टच्या उद्घाटनप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, अ‍ॅड. गौरी वेंकटरमन व अन्य पदाधिकाºयांसोबत अ‍ॅड. आनंद परचुरे, अ‍ॅड. श्रीकांत सिरपूरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयLiftmanलिफ्टमन