शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे भाज्या कडाडल्या; कांदे, टोमॅटो ६० रुपये, कोथिंबीर १२० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 07:30 IST

Nagpur News अतिवृष्टीमुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाल्याने भाव आकाशाला भिडले आहेत.

ठळक मुद्देदरवाढीमुळे गृहिणींचे बजेट वाढले दिवाळीनंतर भाव कमी होणार

नागपूर : अतिवृष्टीमुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाल्याने भाव आकाशाला भिडले आहेत. सध्या स्थानिकांकडून थोडीफार आवक सुरू झाल्याने काही भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. पण किरकोळमध्ये कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची ६० रुपये आणि कोथिंबीर १२० रुपये किलोवर गेले आहे. दिवाळीनंतर स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक वाढल्यानंतर भाव कमी होणार असल्याचे ठोक विक्रेत्यांनी सांगितले.

स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांसह टोमॅटो बेंगळुरू, हिरवी मिरची बुलडाणा व मौदा आणि कोथिंबीर नाशिक, नांदेड, उमरानाला येथून विक्रीला येत आहे. सिमला मिरचीची आवक भिलाई, रायपूर येथून आहे. फूलकोबीचे भाव ६० रुपये आहेत. पालक ७० ते ८० आणि मेथीचे भाव १२० रुपयांवर पोहोचले आहेत. ८० रुपये किलोचे वांगे सध्या ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

ग्राहक जास्त दराच्या भाज्यांची खरेदी करीत नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. कॉटन मार्केट उपबाजारात सध्या ४५ ते ५० गाड्यांची आवक असल्याची माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.

किरकोळमध्ये कांदे @ ५०ठोकमध्ये ४२ रुपये आणि किरकोळमध्ये ६० रुपयांवर गेलेले कांंद्याचे भाव सध्या कमी झाले असून, ठोकमध्ये दजार्नुसार ३० ते ३५ रुपये आणि किरकोळमध्ये ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्यानंतरही गृहिणींसाठी कांदे महागच आहेत. कळमना ठोक बाजारात दररोज २५ ट्रक कांद्याचे ट्रक येत आहेत. उन्हाळ्यात साठविलेल्या जुन्या कांद्याची आवक नाशिक आणि अहमदनगर तर थोडाफार जळगाव जिल्ह्यातून आणि नवीन कांदे कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्य व सातारा जिल्ह्यातून सुरू आहे.

नाशिक व धुळे जिल्ह्यातून नवीन कांद्याची आवक दिवाळीनंतर होणार आहे. दसऱ्यानंतर धुळे जिल्ह्यातून येणाऱ्या कांद्याला उशीर झाला आहे. पांढऱ्या कांद्याचे दोन ट्रक सोलापूर व अमरावती जिल्ह्यातून विक्रीला येत आहेत. अतिवृष्टीमुळे बराच कांदा शेतातच खराब झाला आहे. दोन आठवड्यापासून भाव वाढले आहेत. सध्या आवकीचा अंदाज बांधणे कठीण असून, आवकीनंतरच भाव कमी-जास्त होण्याची शक्यता कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केली.कळमन्यात दजार्नुसार बटाट्याचे भाव १० ते १५ रुपये असून, किरकोळमध्ये भाव ३० रुपयांवर गेले आहेत. आठवड्यात सरासरी १८ ते २० ट्रकची आवक आहे. काही आठवड्यांपूर्वी कळमन्यात ९० ते १०० रुपयांवर गेलेले लसणाचे भाव सध्या ७० ते ८० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मात्र, किरकोळमध्ये १४० ते १५० रुपयांपर्यंत भाव आहेत. दररोज दोन ट्रकची आवक राजस्थान (कोटा) आणि मध्य प्रदेश (मनसोर, जावरा) येथून आहे.

टॅग्स :vegetableभाज्या