शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आरोग्य सेवा अधिक सक्षम करणार : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:39 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधिक बळकट व सक्षम करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

ठळक मुद्देसामूहिक संसर्ग टाळण्यासाठी विशेष पथक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार सातत्याने वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना परिणामकारक राबवतानाच यापुढे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधिक बळकट व सक्षम करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात कोरोना उपचारासंदर्भात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.कोरोनाचा सामूहिक संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व प्रभावी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधेत वाढ करावी यासाठी व्हेंंटिलेटरसह आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येतील. व्हेंटिलेटर खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.इतर जिल्ह्यातून मनुष्यबळ मागवाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन कक्ष अधिक सुसज्ज करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ इतर जिल्ह्यातूनही मागविण्यात यावे. अतितात्काळ असणाऱ्या आरोग्य सेवा वगळता कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाला प्राधान्य द्या. ट्रामा सेंटरसाठी असलेले २० व्हेंटिलेटर तात्काळ सुरू करून त्याचा वापर प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावा. हायरिस्क असलेले कोरोना संशयित रुग्ण तसेच ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले डायबिटीज व इतर आजार असलेल्या संशयित नागरिकांना प्राधान्याने उपचार करावेत, असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.शासकीय कार्यालयात सॅनिटायझरचा वापर कराजिल्हा परिषदेसह इतर कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सॅनिटायझर अथवा साबणाने हात स्वच्छ केल्यानंतरच प्रवेश देण्यात यावा. कुठेही अस्वच्छ वातावरण राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश यावेळी गृहमंत्र्यांनी दिले.मेडिकलमध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्यास प्राधान्यशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही तपासणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्याला प्राधान्य असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले. कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या तपासणी किट, सेफ्टी किट, ट्रिपल एअर मास्क आदी उपलब्ध असून, विभागातील सर्व जिल्ह्यांना आवश्यकतेनुसार पुरविण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुख