लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘इन्सेफेलायटिस’ म्हणजेच ‘मेंदूज्वराचे जुलैै ते आतापर्यंत मेयो व मेडिकलमध्ये २१ रुग्ण आढळून आले असून यातील एका महिन्यात १७ रुग्णांचे बळी गेले आहेत. याला गंभीरतेने घेत आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ)व तहसील आरोग्य अधिकाऱ्यांना (टीएचओ)सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच या आजाराची लक्षणे, तात्पुरता उपचार याची माहिती देत रुग्णाला तातडीने मेयो, मेडिकलमध्ये पाठविण्याचा सूचना केल्या आहेत. या आजाराकडे आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवून असल्याचेही डॉ. जयस्वाल म्हणाले.मेंदूज्वर म्हणजे मेंदूला आलेली सूज. विदर्भात जपानी मेंदूज्वर किंवा चंडिपुराचे रुग्ण आढळून यायचे. परंतु जुलै ते आतापर्यंत आढळून आलेल्या २० रुग्णांचे नमुने तपासले असता हे दोन्ही आजार नसल्याचे समोर आले आहे. मेयो, मेडिकल प्रशासनाने अधिक माहितीसाठी हे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) पाठविले आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला नसल्याचे समजते. हा नवा व्हायरस असल्याचेही बोलले जात आहे. आजाराने बळी गेलेल्या रुग्णांमध्ये १६ बालके व एका महिलेचा समावेश आहे. ही बालके नागपूर जिल्हा, अमरावती, भंडारा, गोंदिया, छिंदवाडा व बालाघाट येथील असल्याचे समजते. ‘लोकमत’ने ७ ऑगस्टचा अंकात ‘मेंदूज्वराने महिन्याभरात १५ बालकांचा मृत्यू’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. उपसंचालक डॉ. जयस्वाल यांनी मेयो, मेडिकलच्या वरिष्ठ डॉक्टरांची या विषयी बैठक घेतली. कार्यालयांतर्गत येणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी व तहसील आरोग्य अधिकाऱ्यांना या आजाराविषयीची माहिती देऊन सतर्क राहण्याच सूचना दिल्या.आजाराकडे लक्ष ठेवून आहोत‘मेंदूज्वर’चा रुग्ण आढळून येत आहे. या रोगाची लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, उलट्या, शुद्ध हरविणे, चक्कर येणे, झटके येणे आणि बेशुद्ध होणे आदी आहेत. दुर्दैवाने या रोगावर विशेष उपचार किंवा अँटीबायोटिक्स नाही. या आजाराचे रुग्ण आढळून येताच काही दिवसांपूर्वी मेयो, मेडिकलच्या वरिष्ठ डॉक्टरांसोबत बैठक घेऊन ‘गाईडलाईन’ तयार करण्यात आल्या. त्या सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी व तहसील आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या. सोबतच असे रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर आवश्यक उपचार करून तातडीने मेयो, मेडिकलमध्ये पाठविण्याचा सूचनाही देण्यात आल्या.डॉ. संजय जयस्वालउपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ, नागपूर
मेंदूज्वराला घेऊन आरोग्य विभाग सतर्क : १७ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:47 IST
‘इन्सेफेलायटिस’ म्हणजेच ‘मेंदूज्वराचे जुलैै ते आतापर्यंत मेयो व मेडिकलमध्ये २१ रुग्ण आढळून आले असून यातील एका महिन्यात १७ रुग्णांचे बळी गेले आहेत.
मेंदूज्वराला घेऊन आरोग्य विभाग सतर्क : १७ बळी
ठळक मुद्देडीएचओ, टीएचओंना दिल्या सूचना