शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कोरोना बाधितांची प्रकृती उत्तम : आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 23:02 IST

आतापर्यंत १०२ संशयित रुग्णांमधून तब्बल ९६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये नागपूरचा एक तर दोन यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. नागपुरात कोरोना बाधितांची संख्या चार तर विदर्भात सहा झाली आहे. मेडिकलमधील रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देघाबरून जाऊ नका : १०२ मधून ९६ नमुने निगेटिव्ह

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूला घाबरून जाऊ नका, पण सतर्क राहा. सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर थुंकू नका. हातांची नियमित स्वच्छता ठेवा. आरोग्य विभागाने सांगितलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास या आजाराला दूर ठेवणे शक्य आहे. म्हणूनच आतापर्यंत १०२ संशयित रुग्णांमधून तब्बल ९६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये नागपूरचा एक तर दोन यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. नागपुरात कोरोना बाधितांची संख्या चार तर विदर्भात सहा झाली आहे. मेडिकलमधील रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला एक पुरुष रुग्ण ११ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. १२ मार्च रोजी या रुग्णाची पत्नी आणि या रुग्णासोबत अमेरिकेहून आलेला पुरुष रुग्णही पॉझिटिव्ह आला. दरम्यान, याच रुग्णासोबत अमेरिकेहून आलेल्या चार रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली. त्यांनी १३ मार्च रोजी मेडिकलमध्ये घशातील द्रव्याचे व रक्ताचे नमुने दिले. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. यात ४३ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत नोंद झालेल्या चार कोरोनाबाधित रुग्णांमधून तिघांवर मेडिकलमध्ये तर एकावर मेयोमध्ये उपचार सुरू आहेत. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत. यामुळे त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.यवतमाळमधील नऊमधून दोघे पॉझिटिव्हयवतमाळ जिल्ह्यातील नऊ लोकांचा समूह दुबई येथे प्रवासाला गेला होता. एक मार्च रोजी ते यवतमाळ येथे परतले. सुरुवातीला आरोग्य विभागाने त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला होता. परंतु नागपुरात एक रुग्ण पॉझिटिव्ह येताच या रुग्णांना १२ मार्च रोजी यवतमाळ मेडिकलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. शुक्रवारी यांचे नमुने नागपूरच्या मेयो रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शनिवारी प्राप्त झालेल्या नमुन्यांच्या अहवालात दोघे पॉझिटिव्ह आले. यामुळे विदर्भात आता कोरोनाबाधितांची संख्या सहा झाली आहे.१५ नमुनेही निगेटिव्हशनिवारी मेयोच्या प्रयोगशाळेत कोरोना संशयितांचे १५ नमुने तपासण्यात आले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आले आहेत. या नमुन्यात मेडिकलचे आठ, मेयो रुग्णालयाचे चार, दोन चंद्रपूर जिल्ह्यातील तर एक वर्धा जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे होते.मेडिकलच्या ओपीडीत घेतले २५ नमुनेमेडिकलच्या ओपीडीत कोरोना विषाणूची शंका असलेले परंतु कुठलेही लक्षणे नसलेले असे २५ संशयितांचे नमुने गोळा करण्यात आले. हे नमुने रात्री उशिरा मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोनाGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)