शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आजाराला दूर ठेवण्यासाठी ‘हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस स्कीम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:14 IST

आजाराला दूर ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यासाठी ‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत ‘हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस स्कीम’ योजना तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआयुर्वेदातील साडेबारा हजार डॉक्टरांवर देणार जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजाराला दूर ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यासाठी ‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत ‘हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस स्कीम’ योजना तयार करण्यात आली आहे. याच्या पहिल्या टप्प्यात आयुर्वेदाच्या १२ हजार ५०० डॉक्टरांची सेवा घेतली जाणार आहे. हे डॉक्टर कर्करोग, पक्षाघात, सांधेदुखी, डेंग्यू आदी आजारांना दूर ठेवण्यासाठी कुठल्या उपाययोजना कराव्यात, काय काळजी घ्यायला हवी, आहार कसा असावा आदींबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. काही काढेही बनवून दाखविणार आहेत.आयुष विभागाच्यावतीने १७ मे रोजी ‘रोगमुक्त भारत’ या विषयावर दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात आयुर्वेदाचा माध्यमातून लोकांमध्ये आजारांची जनजागृती करून त्यावर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. देशात आयुर्वेद महाविद्यालयांची संख्या ३५० तर महारा ष्ट्रात ७५ महाविद्यालये आहेत. यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे व पीएच. डी करणारे असे एकूण १२ हजार ५०० विद्यार्थी आहेत. केंद्र शासन या सर्वच विद्यार्थी व डॉक्टरांना प्रायोगिक तत्त्वावर सेवेत समावून घेणार आहे. तीन हजार लोकसंख्येमागे एका आयुर्वेदिक डॉक्टरची नेमणूक केली जाणार आहे.

एका अधिष्ठात्यांमागे १५ केंद्रआयुर्वेद महाविद्यालयातील एका अधिष्ठात्यांमागे १५ केंद्र दिले जाणार आहे. पुढे हे केंद्र १५ वरून ५० होण्याची शक्यता आहे. सध्या देशभरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) २ लाख ५० हजार डॉक्टर कार्यरत आहेत. त्याच पातळवीर आयुर्वेद डॉक्टरांना आणले जाणार आहे. मात्र, आयुर्वेद डॉक्टरांची सेवा वेगळी असणार आहे.

‘काढा’मधून प्रतिबंधात्मक उपायवेगवेगळ्या औषधीयुक्त वनस्पतीचा काढा करून त्याचे ठराविक मात्रेत सेवन केल्यास काही आजारांना दूर ठेवता येते. आयुर्वेदाचा याच पद्धतीचा वापर या योजनेत केला जाणार आहे. नेमलेले डॉक्टर घरोघरी जाऊन काढे कसे तयार करायचे याचे प्रात्याक्षिक देतील. तुळस, आवळा, अडुळसा, गुडवेल, शतावरी, अश्वगंधा आदींसह २०० ते २५० औषधांचीही ओळख करून देतील. कुठला काढा कधी वापरायचा त्यावर मार्गदर्शन करतील. यावर जो खर्च होईल,तो केंद्र शासन (६० टक्के) व राज्य शासन (४० टक्के) करणार आहे.

प्रतिबंधात्मक उपायाला प्राधान्यरोगमुक्त भारतासाठी शासनाने आयुर्वेदाला प्राधान्य दिले आहे. यात प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात आला आहे. या योजनेमुळे आयुर्वेद पुन्हा घराघरात जाईल. लोकांना याचा लाभ मिळेल.- डॉ. गणेश मुक्कावारअधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय

टॅग्स :Healthआरोग्य