शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे गेले, पुराव्यासह आरोप करणारे गप्प झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 20:15 IST

मुंढे यांची बदली होताच पुराव्यासह आरोप करणारे गप्प का झाले, सभागृहात महापौरांनी दिलेल्या निर्देशांचे काय झाले, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देकार्यादेश झालेली कामे कधी सुरू होणार : गैरव्यवहारातील निलंबनाचे आदेश कुठे गेले?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या इतिहासात सलग पाच दिवस सभागृहाचे कामकाज चालले. प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असा सामना रंगला होता. जून महिन्यातील ही सभा संपूर्ण राज्यभरात गाजली. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे पुराव्यासह आरोप करण्यात आले. गैरव्यवहारातील अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची नगरसेवकांनी मागणी केली होती. परंतु मुंढे यांची बदली होताच पुराव्यासह आरोप करणारे गप्प का झाले, सभागृहात महापौरांनी दिलेल्या निर्देशांचे काय झाले, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.नगरसेवकांच्या मागणीनुसार समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार १८ मार्चपर्यंत या कामाचे कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले होते. सत्तापक्षाच्या नगरसेवकांनी डॉ. प्रवीण गंटावार व डॉ. शिलू गंटावार यांच्या गैरव्यवहाराबाबतचे पुरावे सादर करून त्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर यासंदर्भात पत्रपरिषदा घेऊन हा मुद्दा चांगलाच तापवला होता. मनपाकडे नासुप्रचे विभाग हस्तांतरणाची प्रक्रिया राबवावी. शहरातील कामाच्या संविदाबाबत माहिती स्थायी समितीपासून लपवून ठेवणे या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे याबाबत आयुक्तांना स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी दिले होते. आरोप करणारे नगरसेवकही आता गप्प दिसत आहेत.असे होते महापौरांचे निर्देशनासुप्रचे विभाग हस्तांतरणाची प्रक्रिया राबविण्यात यावी.अर्थसंकल्पानुसार १८ मार्चपर्यंत कार्यादेश झालेली कामे सुरू करावी.नव्याने विकसित केलेल्या पाच रुग्णालयांची चौकशी करून स्थायी समिती अध्यक्षांनी अहवाल सादर करावा.चेंबर रिपेअरसाठी किती खर्च झाला याची चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल द्यावा.नागरिकांना वेठीस धरणारा उपद्रव शोध पथकातील कर्मचारी संदीप उपाध्याय याला तात्काळ काढा.पथदिव्यांची फाईल रोखणाऱ्यातत्कालीन वित्त अधिकारी मोना ठाकूर यांच्यावर शिस्तभंग कारवाईची शिफारस करावी.केटी नगर येथील कोविड केअर सेंटर झालेल्या खर्चाची चौकशी करून अहवाल सादर करावा.स्थायी समितीची परवानगी न घेता रजेवर जाणारे आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे.डॉ. प्रवीण गंटावार व डॉ. शिलू गंटावार यांच्या गैरव्यवहाराबाबत त्यांचे तात्काळ निलंबन करून चौकशी करा.कोविड-१९ अंतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजना व नियोजनाचा अहवाल सादर करा.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका