रस्ता दुभाजक व डिव्हायडरची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:32+5:302021-01-16T04:13:32+5:30

उमरेड : राज्याची उपराजधानी नागपूरसाठी उमरेड येथून चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २०२१ मध्येच संपूर्ण महामार्ग सज्ज ...

Headaches of road dividers and dividers | रस्ता दुभाजक व डिव्हायडरची डोकेदुखी

रस्ता दुभाजक व डिव्हायडरची डोकेदुखी

Next

उमरेड : राज्याची उपराजधानी नागपूरसाठी उमरेड येथून चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २०२१ मध्येच संपूर्ण महामार्ग सज्ज झालेला दिसणार आहे. तूर्त रस्ता दुभाजक (डिव्हायडर) आणि सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) या दोन गंभीर समस्या या महामार्गासाठी डोकेदुखी ठरत आहेत. यावर योग्य उपाययोजना न केल्यास अपघाताचे प्रमाण वाढेल आणि यातूनच हकनाक बळीही जातील, अशी भीती वर्तविली जात आहे. सध्या गांगापूर ते भिवापूर मार्गस्थित वाय पाँईट परिसरात डिव्हायडरचे काम सुरू आहे. उपरोक्त मार्गावर केवळ तीन ठिकाणीच डिव्हायडर कट करून शहराकडे वा बाहेर ये-जा करण्यासाठी मार्ग तयार करण्यात आल्याचे दिसून येते. यामध्ये कळमना रोड, छत्रपती शिवाजी चौक (बाबा सावजी) आणि मोहपा रोड या परिसरात डिव्हायडर कट करीत रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. छत्रपती शिवाजी चौक परिसरात ट्रकच्या रांगा नेहमीच दिसून येतात. शिवाय खासगी आणि सरकारी बसेसमध्ये सुद्धा याच परिसरातून प्रवासी चढतात-उतरतात. वळणमार्ग असल्याने वाहनांच्या वेगावर ताबा मिळवताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे गांगापूर चौक ते भिवापूर नाकापर्यंत अजून काही ठिकाणी डिव्हायडर कट करण्याची मागणी व्यक्त होत आहे.

सर्व्हिस रोडचे काय?

चारपदरीचे काम सुरू असताना सर्व्हिस रोडचा प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात आला. निदान गांगापूर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक, भिवापूर नाका चौक या परिसराला सर्विस रोड अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा याकडे लक्ष वेधल्या गेले. सध्यातरी महामार्गावरील सर्व्हिस रोडची समस्या सुटलेली दिसत नाही.

एकमेकांकडे बोट

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे उमरेड-नागपूर महामार्गाचे काम सोपविल्या गेले आहे. सर्व्हिस रोडबाबत अनेकांनी या विभागाकडे विचारणा केली. सर्व्हिस रोडचे काम आमचे नसून नगर पालिकेची जबाबदारी आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग देत आहे. महामार्ग जर आपण बनवत असाल तर मग पालिका सर्व्हिस रोड कोणत्या कारणाने बनवेल, असा सवाल पालिकेचा आहे.

विमा अभिकर्त्यांचे काम बंद आंदोलन

उमरेड : आपल्या विविध मागण्यांसाठी स्थानिक विमा अभिकर्त्यांनी दोन दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे. अभिकर्ता तसेच पॉलिसीधारकांना सौहार्द्रपूर्वक वागणूक दिली जात नाही, असा आरोप लाईफ इन्शुरन्स एजंट असोसिएशन नागपूर विभाग स्थानिक उमरेड शाखेच्या वतीने करण्यात आला आहे. रोख काऊंटरसमोर रकमेचा भरणा करण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांची रांग असते. अशावेळी तीन वाजेपर्यंत रांगेत उभे असलेल्या सर्वांकडून रक्कम घेण्यात यावी. रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांऐवजी पर्यायी व्यवस्था केली जावी. लेटलतीफ कारभारावर नियंत्रण ठेवण्यात यावे. मंद कारभाराकडे लक्ष द्यावे आदी मागण्यांचे निवेदन स्थानिक शाखा प्रबंधकांना सोपविण्यात आले. यावेळी संघठनेचे रवींद्र चवरे, सचिन येनुरकर, मुकेश गौतम, राजेंद्र चांदेकर, सतीश तांबेकर, बी.पी. गोमासे आदींनी निवेदन सोपविले. शाखा प्रबंधक सुधाकर मेश्राम यांनी अभिकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

Web Title: Headaches of road dividers and dividers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.