शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘त्याला’ १० मिनिटांचा उशीर झाला अन् ‘तो’ पोलिसांच्या हाती लागला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 22:22 IST

Nagpur News चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर आरोपीने पुढची तयारी केली होती. मात्र, त्याला रेल्वेस्थानकावर पोहचण्यासाठी १० मिनिटे उशिर झाला अन् त्याचमुळे मोठा अनर्थ टळला.

नरेश डोंगरेनागपूर : चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर आरोपीने पुढची तयारी केली होती. मात्र, त्याला रेल्वेस्थानकावर पोहचण्यासाठी १० मिनिटे उशिर झाला अन् त्याचमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या अपहरण प्रकरणात पोलिसांकडून थोडी का हयगय, थोडा का उशिर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. हलगर्जीपणा कसा आयुष्यभरासाठी घाव देऊन जातो, त्याचा अत्यंत कटू अनुभव एका पित्याला आला असता. सुदैवाने तसे काही घडले नाही. मात्र, राजू छत्रपाल नामक पित्याचा थोडासा हलगर्जीपणा आज पितृदिनाच्या पूर्व संध्येला उपराजधानीतील हजारो - लाखो पित्यांना आयुष्यभरासाठी धडा शिकवून गेला. प्रकरण आहे, ईतवारी रेल्वेस्थानकावर घडलेल्या उर्मी राजू छत्रपाल या पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचे अन् तिच्या अपहरणापूर्वीच्या घडामोडीचे !

रेल्वेच्या तिकिटाचे रिझर्वेशन करण्याच्या निमित्ताने राजू लाडक्या उर्मीला खांद्यावर घेऊन गेला होता. तो तिला खांद्यावर घेऊनच (किंवा जवळ उभी करून) रिझर्वेशनची प्रक्रिया पार पाडू शकला असता. मात्र, त्याने तिला काहीसे दूर बसवून रिझर्वेशनची प्रक्रिया पार पाडण्याची चूक केली अन् ती त्याला चांगलाच धडा देणारी ठरली. ईकडे आरोपी शामकुमारने डाव साधला. तो चिमुकल्या उर्मिला घेऊन थेट मुख्य रेल्वेस्थानकावर पोहचला. पुर्व दारावरून फलाट क्रमांक पाच वरून पुर्वेच्या फलाट क्रमांक एक वर आला. उर्मी रडू नये म्हणून त्याने उर्मिला समोसा, चॉकलेट घेऊन दिले. तिच्याजवळ मोबाईल देऊन तिला गुंतवून ठेवले. कुणाला शंका येऊ नये म्हणून उर्मीला एका महिलेच्या बाजुला बसवून तो स्वत: दुरूनच लक्ष ठेवत सिगारेटचे झुरके ओढू लागला. येथे छत्तीसगडकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत तो बसणार होता. मात्र, त्याला १० मिनिटे उशिर झाला. त्यामुळे ११.४० ची बिलासपूरला जाणारी रेल्वेगाडी निघून गेली. हीच घडामोड चिमुकली उर्मी, तिचे पालक आणि तिचा शोध घेणाऱ्या पोलिसांसाठी सुदैवी ठरली. तर, आरोपीसाठी अद्दल घडविणारी ठरली. रविवारी जगभरात फादर्स डे साजरा होणार आहे. नागपुरात चिमुकल्यांच्या अपहरणाच्या घटना आणि त्यानंतरचा घटनाक्रम फारच थरारक आहे. त्यामुळे अनेक पालकांना त्यामुळे उर्मीच्या अपहरणाने काही वेळेसाठी धडकी भरली होती.

मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा सदस्य?

पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यानंतर आरोपी शामकुमार ध्रुव वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत आहे. कधी तो टाईल्स फिटिंग करतो तर कधी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो, असे सांगत आहे. तो आज सकाळीच शिवनाथ एक्सप्रेसने बिलासपूरहून नागपुरात आला होता. काही तासातच त्याने उर्मिने अपहरण केलेे अन् बिलासपूरला पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा सदस्य आहे का, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

अपहरणाचा ईन्कार, म्हणतो...उर्मीचे अपहरण का केले, कोणता उद्देश आहे, अशी विचारणा केली असता आरोपी अपहरण केल्याचा स्पष्ट ईन्कार करीत आहे. ती तेथे बसून दिसली म्हणून मी तिला उचलून घेतले, असे तो पोलिसांना सांगतो. कोणताही संबंध नसताना, कुठलीही ओळख नसताना उर्मीला उचलून थेट दुसऱ्या प्रांतात का घेऊन जात होता, या प्रश्नावर मात्र तो माैनीबाबाची भूमीका साकारतो. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी त्याचा छत्तीसगड पोलिसांकडून क्राईम रेकॉर्ड मागविला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण