शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

अमरावती जिल्ह्यातील बहिरमबुवाच्या पायथ्याशी राहणारा पाथरवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 12:44 IST

किती वर्स झाले आठवत नाही आता पण बहिरमबाबाच्या संगतीनं ऱ्हातो.. पांढरे मळकट धोतर, तसाच शर्ट आणि डोक्यावर टोपी.. हातात छिन्नी आणि हातोडा. हे आहेत मारोतराव भीमराव शिंदे.

ठळक मुद्देखरपा, भुरका व काळ्या हेच सवंगडी

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: किती वर्स झाले आठवत नाही आता पण बहिरमबाबाच्या संगतीनं ऱ्हातो.. पांढरे मळकट धोतर, तसाच शर्ट आणि डोक्यावर टोपी.. हातात छिन्नी आणि हातोडा. हे आहेत मारोतराव भीमराव शिंदे. वय साधारण ४५ ते ५० च्या घरातले. व्यवसाय पाथरवटाचा. अमरावती जिल्ह्यातल्या बहिरम या यात्रेच्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी एका साध्या कनातीत गेल्या कित्येक वर्षांपासून राहतात. सोबत त्यांची पत्नीही असते.एकदा बहिरम यात्रेला आलो आणि येथेच राहून गेलो. हातात असलेल्या पाट्यावर टाके घालता घालता ते सांगू लागतात. आमचं घराणंच पाथरवटाचं. याभागात आमचे पूर्वज यायचे. त्यांच्यासोबतीने आलो आणि इथलाच झालो.त्यांचे खोपटे म्हणजे चारही बाजूंनी खालून उघडा असलेला एक तंबू. त्यातच चार गाडगी मडकी आणि जरुरीपुरते थोडेसेच सामान. दिवसभर अंगणात बसून जाती आणि पाटे वरवंटे घडवत रहायचे हा एकमेव उद्योग.येथे पाट्या वरवंट्याचा दगड येतो तो बुलढाणा जिल्ह्यातून. त्यात खरपा हा लाल रंगाचा दगड सर्वात मजबूत असतो. त्यानंतर येतो पांढरट भुरका व त्याखालोखाल असतो काळा दगड. एक मोठ्या आकाराचं जात घडवायला किमान तीन दिवस लागतात तर पाटा वरवंटा हा साधारण दोन दिवसात होतो.दिवसरात्र हातोडा आणि छिन्नीने ठोकून ठोकून त्यांचे खांदे दुखतात असं सांगून रात्रीची झोप झाली की सकाळी बरं वाटतं असंही ते म्हणतात. दगडाला टाके घालताना डोळ्याना खूप जपावे लागते. डोळ्यात कण उडाला तर डोळा जाण्याची भीती असते. मात्र मारोतरावांना अद्याप चष्मा लागलेला नाही. मधुमेह, ब्लडप्रेशरसारखा कुठलाही शहरी आजार नाही. तब्येत ठणठणीत आहे. सकाळी उठून काशी तलावात जाऊन स्नान करणे, बहिरमबुवासमोर डोके ठेवून परत येणे आपल्या नित्याच्या कामाला लागणे हा त्यांचा रोजचा शिरस्ता. जगात काय नवे घडते आहे, तंत्रज्ञान किती प्रगत झाले आहे याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांचे जग फक्त बहिरमचा पायथा एवढेच.

टॅग्स :Amravatiअमरावती