शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

त्याला आईने दिला पुन्हा जन्म

By admin | Updated: August 26, 2016 02:41 IST

२० वर्षांपूर्वी त्याला जन्न देताना तिने मरणयातना सोसल्या. प्राणांतिक प्रसवकळा अनुभवत त्याला जन्म दिला.

किडनी दिली : सुपरमध्ये पाचवे प्रत्यारोपण यशस्वीनागपूर : २० वर्षांपूर्वी त्याला जन्न देताना तिने मरणयातना सोसल्या. प्राणांतिक प्रसवकळा अनुभवत त्याला जन्म दिला. आज २० वर्षानंतर मरणाच्या दारात पोहचलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला तिने पुन्हा परत आणले. स्वत:ची किडनी देऊन एकप्रकारे त्याला पुन्हा जन्म दिला. ही करुण कहाणी आहे एका गरीब मातेच्या मातृत्त्वाची, तिच्या त्यागाची. आईच्या त्यागापुढे तिच्या वात्सल्यापुढे जगात कशाचाही तुलना होऊ शकत नाही. त्याचा प्रत्यय गुरुवारी स्थानिक सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमधील डॉक्चर, कर्मचाऱ्यांनी अनुभवला. साऱ्यांच्याच डोळ्यात अश्रू तरळून आले. गुरुवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आईने दिलेल्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. सुपरमधले हे पाचवे यशस्वी किडनी प्रत्यारोपण आहे. मुलाला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणणाऱ्या आईचे नाव आहे सुनंदा गौतम माटे (४०), तर मुलाचे नाव सुशान्स माटे (२०) आहे. हे कुटुंब मूळ परसोडी, पोस्ट खापरी, तहसील पवनी जिल्हा भंडारा येथील आहे. परंतु त्यांचे गाव गोसेखुर्द धरणात आल्याने त्यांना नागपूर शहराचा आश्रय घ्यावा लागला. गेल्या काही वर्षांपासून कुशीनगर जरीपटका येथे हे माटे कुटुंब निवासाला आहे. सुशान्सचे वडील गौतम माटे हातमजुरी करतात. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. यातच तरुण मुलाला किडनीचा आजार झाल्याने या कुटुंबावर संकट कोसळले होते. गेल्या वर्षभरापासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुशान्सवर डायलिसीस सुरू होते. डॉक्टरांनी किडनी दानाच्या संदर्भात सुशान्सच्या आई व वडिलांना माहिती दिली होती. राजीव गांधी जीवनदायी योजनेतून मदतनागपूर : तपासणीत आईचे आणि मुलाचे रक्तगट सारखेच, ‘ए पॉझिटिव्ह’ निघाले. आईने किडनी दान करून मुलाला वाचवण्याचा निश्चय केला. यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मदतीला धावून आली. किडनी प्रत्यारोपणासाठी येणारा सर्व खर्च या योजनेतून करण्यात आला. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी किडनी युनिट उभारण्याचे प्रयत्न केल्यामुळेच सुपरमध्ये हे शक्य झाले आहे.(प्रतिनिधी)किडनी रुग्णांना फायदादिवसेंदिवस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी रुग्णांची संख्या वाढत आहे. याला घेऊनच किडनीचा स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने २० खाटांचा हा वॉर्ड सुरू झाला आहे. लवकरच सहयोगी प्राध्यापक व दोन वरिष्ठ निवासी डॉक्टर उपलब्ध होतील. हा वॉर्ड नसल्याने येथील रुग्णांना मेडिकलमध्ये उपचारासाठी जावे लागत होते. याशिवाय ‘युरोलॉजी’ विभागाचे शस्त्रक्रिया गृह ‘मॉड्यूलर’ करणे सुरू आहे. याला आणखी दोन महिन्याचा कालावधी आहे. त्यानंतर किडनी ट्रान्सप्लांट याच शस्त्रक्रिया गृहात होईल. -डॉ. मनीष श्रीगिरीवार, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल