शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी तो बनला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:17 IST

दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी एका व्यक्तीने चोरीचा मार्ग अवलंबिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (२९) रा. बल्लारपूर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. घरफोडीच्या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने चोरीची कबुली दिली आहे. चोरीचा मालही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी एका व्यक्तीने चोरीचा मार्ग अवलंबिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (२९) रा. बल्लारपूर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. घरफोडीच्या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने चोरीची कबुली दिली आहे. चोरीचा मालही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.जरीपटका येथील अमित राजू कांबळे हे गेल्या २६ मे रोजी कुटुंबासह मावशीकडे गेले होते. दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पेट्रोलिंग करताना समतानगर येथील पानठेल्यावर एक व्यक्ती सोन्याचे मणी विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा आरोपी नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार रा. यादवनगर समता ले-आऊट हा पोलिसांना पाहून पळू लागला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याजवळ ५०० रुपये रोख आणि सोन्याचे ५ मणी आढळून आले. नीलेशची विचारपूस केली असता त्याने सांगितले की, त्याची पहिली पत्नी ही चंद्रपूरला राहते. येथे तो कामानिमित्त आला आहे. नागपुरातही त्याची दुसरी पत्नी आहे. दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी तो चोरी करण्याकडे वळल्याचे सांगितले. त्याने तीन घरफोडी केल्याची कबुलीही दिली. त्याच्याजवळून ५ सोन्याचे मणी, दोन कानातले, एक सोन्याची लगडी, तीन चांदीच्या पायपट्टी, ४० हजाराची एक दुचाकी, असा एकूण ६७,९५० रुपयाचा माल जप्त केला.

टॅग्स :theftचोरीArrestअटक