शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेअर ट्रेडिंग रॅकेटमध्ये हवाला ‘लिंक’, दुबईला आरोपींकडे वळविले जातात पैसे

By योगेश पांडे | Updated: July 5, 2024 00:58 IST

केरळमधील आरोपीच्या अटकेनंतर समोर आली बाब

नागपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविण्याच्या नावावर फसवणूक करण्याचे प्रमाण देशभरात वाढले असून ‘प्रोफेसर गॅंग’सारख्या अनेक टोळ्या यात कार्यरत आहेत. यातील अनेक आरोपी हे दुबई किंवा युनायटेड किंगडममध्ये बसून हे रॅकेट चालवतात. या रॅकेटमधील एक नवीन खुलासा समोर आला आहे. फसवणुकीनंतर विविध बॅंक खात्यांच्या मार्गे वळविली जाणारी रक्कम अखेर हवालाच्या माध्यमातून दुबईला पाठविण्यात आल्याची बाब केरळमधील एका आरोपीच्या अटकेनंतर तपासातून समोर आली आहे.‘लोकमत’ने ‘ट्रेडिंगचा भूलभुलैया’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून देशविदेशातील सायबर गुन्हेगारांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘फ्रॉड’वर प्रकाश टाकला होता. यात गुन्हेगारांची ‘मोडस ऑपरेंडी’, ‘ब्लॉक ट्रेडिंग’च्या नावाखाली जास्त नफ्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना भ्रमित करणे, त्यांचे हायटेक जाळे, त्यांनी बनविलेले अनधिकृत ॲप्स इत्यादी बाबींवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला होता. अशा रॅकेटमध्ये गुंतवणूकदारांनी आरोपींनी सांगितलेल्या बॅंक खात्यात पाठविलेली रक्कम विविध खात्यांमध्ये लगेच वळविली जाते. यासाठी तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावाने बॅंक खाते उघडण्यात येते. त्याचे संपूर्ण संचालन आरोपी किंवा त्यांचे एजंट करत असतात.पोलिसांच्या मनी ट्रेलपासून वाचण्यासाठी आरोपींनी नवीन शक्कल शोधून काढली आहे. पोलिसांकडून बॅंक खाते गोठविल्यावर ती रक्कम आरोपींना मिळूच शकत नाही. त्यामुळे वेगाने विविध खात्यांमध्ये रक्कम वळती करून ती रोख स्वरूपात काढली जाते. त्यानंतर हवालाच्या माध्यमातून दुबई किंवा इतर ठिकाणी पाठविली जाते. केरळमधील एका ३.९८ कोटींच्या फसवणुकीच्या घटनेत अबू बकर नावाच्या आरोपीला केरळ पोलिसांनी अटक केली. अबू हा दुबईतून त्याचे रॅकेट संचालित करत होता. ट्रेडिंगसोबतच तो तोतया सीबीआय अधिकारी बनून नागरिकांना ब्लॅकमेलदेखील करत होता. त्याच्या चौकशीतून हवालाची बाब समोर आली. हवालामार्गे दुबईला रोख रक्कम वळविली जात होती. केवळ अबूच नव्हे तर इतर सायबर ठगांच्या टोळ्यादेखील अशाच पद्धतीने भारतीयांच्या मेहनतीच्या पैशांवर हात मारत असल्याचे चित्र आहे.बॅंक खाते, हवालासाठी एजंट्ससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अबू बकरच्या चौकशीतून एजंट्सच्या साखळीची बाबदेखील उघडकीस आली. ग्रामीण भागातील लोकांना काही पैसे देऊन त्यांच्या नावाने बॅंक खाते हे एजंट्स उघडतात. प्रत्येक एजंट जवळपास ३० ते ४० बॅंक खात्यांची जबाबदारी पाहतो. त्या खात्यांमधील पैसे हवालाच्या माध्यमातून हे एजंट्सच दुसऱ्या राज्यांत किंवा दुबईला पाठवितात. काही एजंट यासाठी मुंबई किंवा इतर मोठ्या शहरात पोहोचतात व तेथून हवालाचे पैसे पुढे पाठवितात.

टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक