शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संवर्धनासाठी नियम निश्चित केले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 19:44 IST

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम तयार केले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली.

ठळक मुद्देहायकोर्टाची मनपाला विचारणा : ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम तयार केले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली. तसेच, यावर ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग अहुजा यांनी या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून हेरिटेज संवर्धन नियमानुसार हेरिटेजच्या संरक्षण व संवर्धनाकरिता हेरिटेज समितीच्या सहमतीने विशेष नियम निश्चित करणे अनिवार्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच, कस्तुरचंद पार्कच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम तयार करण्यात आले नाहीत याकडे लक्ष वेधले. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेतली व कस्तुरचंद पार्ककरिता विशेष नियम निश्चित करण्यात आले की नाही, अशी विचारणा मनपाला केली आणि नियम निश्चित केले गेले नसेल तर, कस्तुरचंद पार्कचे संवर्धन कसे व कोणत्या पद्धतीने कराल, हा प्रश्न उपस्थित होतो असे मत व्यक्त केले. उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये कस्तुरचंद पार्कच्या दुरवस्थेची दखल घेऊन स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली. दरम्यान, न्यायालयाने वेळोवेळी आवश्यक आदेश दिल्यामुळे मैदानावरील अतिक्रमण हटविण्यात आले. मैदानावरील व्यावसायिक कार्यक्रम बंद झाले. परंतु, गेल्या काही महिन्यांत विविध विकास कामांमुळे मैदानाची दुरवस्था झाली. मैदानावरील स्मारकाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे पुढे आले. यासंदर्भात दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी झाली नसल्याचा मुद्दा पुढे आल्यानंतर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी स्वत: कस्तुरचंद पार्कला भेट देऊन दुरवस्थेची पाहणी केली होती.मैदानाचे समतलीकरण झाले का, कस्तुरचंद पार्कमधील भूमिगत ड्रेनेजचे व मैदानाच्या समतलीकरणाचे काम पूर्ण झाले का, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना केली. तसेच, यावर पुढच्या तारखेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्कNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका