शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अवैध अतिक्रमणावर हतोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:51 IST

महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकांची गुुरुवारी दिवसभर धावपळ सुरू होती. शहराच्या विविध भागातील अतिक्रमण हटविण्यात आले.

ठळक मुद्देगांधीबागमध्ये मोहीम : रामनगरमधील शेड तोडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकांची गुुरुवारी दिवसभर धावपळ सुरू होती. शहराच्या विविध भागातील अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्याने नासुप्रच्या पथकाला अंबाझरी मार्गावरील विद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमण न काढताच परतावे लागले.असाच प्रकार बगडगंज येथे घडल्याने गुुरुवारी पथकाची चांगलीच धावपळ झाली.शहरातील चौक व रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त असल्याने, गेल्या दोन दिवसापासून लोकमतने अतिक्रमण विरोधात मोहीम हाती घेतली आहे. चौक व रस्त्यांवरील अतिक्र मणाचे वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याची दखल घेत महापालिका व नासुप्रने अतिक्रमणाविरोधात मोहीम सुरू केली आहे.महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक गांधीबाग येथील तीन नल चौकातील संत गुरुसिंह कापड दुकानाच्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पाडण्यासाठी पोहचले होते. तिथे परवानगी न घेता तिसºया व चौथ्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. पथक पोहचताच जागा मालकांनी बांधकाम नकाशा मंजुरीसाठी महापालिकेकडे अपील केल्याची माहिती दिली. त्यामुळे पथकाचा खर्च म्हणून ९० हजार रुपये वसूल करून पथक परतले.त्यानंतर पथक जुना बगडगंज येथील रॉयल प्लाझा अपार्टमेंट येथे पोहचले. बिल्डरने अतिरिक्त बांधकाम केले आहे. परंतु फ्लॅटधारकांना याची माहिती नव्हती. त्यांनी यासंदर्भात नगरविकास विभागाकडे अपील दाखल केल्याची माहिती देण्यात आली. प्रकरण प्रलंबित असल्याने ४० हजार रुपये शुल्क वसूल करून पथक परतले. आसीनगर झोनच्या पथकाने महेंद्रनगर भागातील अतिक्रमण हटविले तसेच रामनगर भागातील अतिक्रमण करून उभारण्यात आलेले शेड तोडण्यात आले.