शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हर्षिनी कान्हेकर झाल्या पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 23:30 IST

नागपूरकर हर्षिनी कान्हेकर या देशाच्या पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी झाल्या आहेत. त्यामुळे उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ठळक मुद्देसन्मानित होणार : उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूरकर हर्षिनी कान्हेकर या देशाच्या पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी झाल्या आहेत. त्यामुळे उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने २० जानेवारी रोजी राष्ट्रपती भवन येथे विविध क्षेत्रावर प्रथमच नाव कोरणाऱ्या देशातील ११३ महिलांना सन्मानित केले जाणार आहे. त्यात कान्हेकर यांचाही समावेश आहे. त्यांनी २००६ मध्ये नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून बी. ई. पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांची मुंबईतील ओएनजीसी येथे अग्निशमन अधिकारीपदी निवड करण्यात आली. कान्हेकर यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना अलीकडेच नीती आयोग व संयुक्त राष्ट्र यांच्यातर्फे ट्रान्सफार्मिंग वूमन आॅफ इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंबाझरी येथील वर्मा ले-आऊटमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. त्यांचे वडील पाटबंधारे विभागात कार्यरत होते. यापूर्वी मदर टेरेसा, कल्पना चावला, बछेंद्रीपाल, ऐश्वर्या राय, पी. व्ही. सिंधू, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी जगप्रसिद्ध महिलांना त्या-त्या क्षेत्रातील प्रथम महिलेचा पुरस्कार मिळाला आहे.उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष नकोमहिलांनी उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन हर्षिनी कान्हेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. कुटुंबातून सतत उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळत होती. त्यामुळे आज या स्थानावर पोहोचू शकले, असे त्यांनी सांगितले व प्रथम महिला पुरस्कार मिळत असल्यामुळे आनंद व्यक्त केला.

टॅग्स :fireआगWomenमहिला