शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृह परिसरातून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:10 IST

अजनीचे पोलीस आरोपी साईमनला घेऊन मध्यवर्ती कारागृहाच्या समोर निर्माण करण्यात आलेल्या मंगलमूर्ती लॉनमधील तात्पुरत्या कारागृहात पोहोचले. तेथे त्याला कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलीस गाफिल असल्याची संधी साधून साईमनने धूम ठोकली.

ठळक मुद्देपोलिसांच्या हातावर तुरी पोलीस दलात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक गुन्ह्यात सहभागी असलेला अट्टल गुन्हेगार साईमन फ्रान्सिस अँथोनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. रविवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास कारागृह परिसरात ही घटना घडली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

आरोपी साईमन याला अजनी पोलिसांनी २७ ऑगस्टला दुचाकी चोरीच्या आरोपात अटक केली. होती. २८ ऑगस्टला न्यायालयात हजर करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड मिळवला. रिमांड संपल्यामुळे त्याला पोलिसांनी रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिल्यामुळे अजनीचे पोलीस आरोपी साईमनला घेऊन मध्यवर्ती कारागृहाच्या समोर निर्माण करण्यात आलेल्या मंगलमूर्ती लॉनमधील तात्पुरत्या कारागृहात पोहोचले. तेथे त्याला कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलीस गाफिल असल्याची संधी साधून साईमनने धूम ठोकली. तो पळत असल्याचे पाहून अजनी पोलीस तसेच कारागृह पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र नगरसेवक लक्ष्­मी यादव यांच्या घराच्या गल्लीतून अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून गेला. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी अजनीचे ठाणेदार प्रदीप रायनावार तसेच नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यामुळे या भागातील गस्तीवरील पोलीस पथके शोधाशोध करू लागले. रात्री १० वाजेपर्यंत तो हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांचा शोध घेतला जात आहे.पोलिसांना कारवाईचा धाकया घटनेमुळे पोलिसंवर मोठे दडपण आले आहे. जे पोलीस साईमनला घेऊन कारागृहात पोचले होते. त्यांना स्वत:वरील कारवाईचा धाक वाटत आहे. आरोपी लवकर सापडला नाही तर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

 

टॅग्स :jailतुरुंग